मुंबई : आरबीआयने 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबरपासून ही नोट चलनातून बाद होणार आहे. त्यामुळे अनेकांना आता असा प्रश्न पडला आहे की नोटा छापण्यासाठी नेमका किती खर्च येतो? आरबीआयला नोटा छापण्यासाठी प्रिंटिंग कॉस्ट द्यावी लागते. वाढत्या महागाईसोबत प्रिटिंग कॉस्टही वाढला आहे. पेपर आणि इंकच्या खर्चात गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. यामुळे नोटा प्रिंटिंगचा खर्चही वाढला आहे. चला जाणून घेऊयात 10 रुपयांपासून 2000 हजार रुपयांची नोट छापण्यासाठी किती प्रिटिंग कॉस्ट लागते.
आरबीआयला सर्वाधिक प्रिंटिंग कॉस्ट 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांऐवजी 200 रुपयांच्या नोटांसाठी द्यावा लागतो. जितकी छोटी चलनी नोट तितका छपाई खर्च जास्त होतो. म्हणजेच 10 रुपयांच्या नोटेची छपाई खर्च सर्वाधिक आहे. दुसरीकडे 2000 आणि 500 रुपयांच्या तुलनेत 200 रुपयांच्या नोटा चलनात जास्त आहेत. त्यामुळे छपाईचा खर्च जास्त आहे.
आरबीआयच्या मते, 10 रुपयांची छोटी नोट छापण्यासाठी म्हणजेच 1 हजार नोटा छापण्यासाठी 960 रुपये खर्च होतो. म्हणजेच एक नोट छापण्यासाठी 96 पैसे खर्च होतात. तर 20 रुपयांच्या 1 हजार नोटा छापण्यासाठी 950 रुपये खर्च होतो. म्हणजेच एक नोट छापण्यासाठी 95 पैसे खर्च होतात. याच प्रमाणे 500 रुपयांच्या 1 हजार नोटा छापण्यासाठी 2290 रुपये खर्च होतो.
भारत सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्याच निर्णय घेतला होता. त्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला रात्री 8 वाजता संबोधित करताना हा निर्णय जाहीर केला होता. रात्री 12 नंतर 500 आणि 1000 रुपयांचा नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर सरकारने नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. यात 500 आणि नवीन 2 हजार रुपयांची नोट सुरु केली होती.