देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती बालाजीच्या पुजाऱ्यांना किती मिळते वेतन?, अशी केली जाते निवड ?

| Updated on: Sep 29, 2024 | 1:27 PM

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थानातील प्रसाद म्हणून वाटल्या जाणाऱ्या लाडूतील घटक पदार्थावरुन वाद सुरु आहे. या मंदिराच्या पुजाऱ्यांचा थाट काही औरच असतो. त्यांचे वेतनाचे आकडे डोळे दीपविणारे आहेत.

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती बालाजीच्या पुजाऱ्यांना किती मिळते वेतन?, अशी केली जाते निवड ?
tirupati balaji temple
Follow us on

तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसाद म्हणून वाटल्या जाणाऱ्या लाडूत वापरल्या जाणाऱ्या तुपावरुन वाद सुरु आहे. देशातील सर्वाधित श्रीमंत मानल्या जाणाऱ्या या देवस्थानाच्या धार्मिक बाबींची जबाबदारी चार शक्तीशाली पुरोहितांच्या कुटुंबांकडे सोपविण्यात आली असून अनेक पिढ्यांपासून ते देवाची पूजाअर्चा करण्याचा मान त्यांना देण्यात आला आहे. या परिवारातील लोक रोज पहाटे पासून संध्याकाळपर्यंत धार्मिक अनुष्ठान करीत असतात. परंपरेनुसार मंदिराच्या ट्रस्टने या चार श्रीमंत कुटुंबांतील 23 लोकांना पुजारी म्हणून नियुक्त केलेले आहे. तर एकुण कर्मचाऱ्यांची संख्या 58 इतकी आहे.

ही चार कुटुंबे पाहातात कारभार

तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिराच्या धार्मिक अनुष्ठान आणि इतर धार्मिक पूजेची जबाबदारी चार मातब्बर घराणी करतात. दीपल्ली, गोल्लापल्ली, पेद्दिन्थी आणि तिरुपतम्मा ही चार कुटुंबे पिढ्यानुपिढ्या बालाजी मंदिराची पूजा करीत आली आहेत. तिरुमालाच्या श्री व्येंकटेश्वर स्वामी मंदिरात सर्व धार्मिक अनुष्ठानाची जबाबदारी यांच्यावर आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानम ट्रस्टने विविध कार्यासाठी सुमारे 16,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ट्रस्टने मंदिरात 35 घराण्याच्या बाहेरील पुजाऱ्यांची देखील नियुक्ती केलेली आहे.

किती असते वेतन

मुख्य पुजाऱ्याला प्रताधन आराधक नावाने ओळखले जाते. त्यांची नियुक्ती वंशपरंपरागत पद्धतीने होत असते. त्यांना 82,000 रुपये दर महिना वेतन दिले जाते. अन्य मुख्य पुजारी देखील वंशपरंपरागत पद्धतीने नियुक्त केले जातात. त्यांना 52,000 मेहनताना आणि अन्य खर्च दिले जातात. वंशाबाहेरील पुजाऱ्यांना त्यांचा अनुभवानुसार 30,000 ते 60,000 वेतन दिले जाते.

सेवानिवृत्तीचा कालावधी

तिरुपती बालाजी  मंदिराच्या पुजाऱ्यांच्या निवाससाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. त्यांना वेतना व्यतिरिक्त अन्य भत्ते देखील मिळतात. पुजाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 65 असते. त्यानंतर त्यांना सेवानिवृत्तीचा देखील लाभ दिला जातो. परंतू घराण्याच्या बाहेरी पुजाऱ्यांना मात्र सेवानिवृत्ती वेतन दिले जात नाही. या संदर्भात न्यायालयात प्रकरण गेलेले आहे.