पणजी : गोवा राज्यातील लसीकरण (Vaccination) केंद्र बंद होणार आहेत. कारण गोव्याने पहिला नंबर पटकावला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देणारे देशातील पहिले राज्य गोवा ठरलं आहे. गोव्यात शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 18 वर्षावरील 11.66 लाख नागरिकांना लसीकरण पूर्ण करण्याात आलंय. निवडणूक (Goa elections 2022) प्रक्रियेमुळे रखडलेल लसीकरण अखेर आज पूर्ण झाले आहे. गेल्या जवळपास अडीच वर्षापासून कोरोनाने (Corona) जगाला हैराण करून सोडले आहे. कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट अशा अनेक लाटा जगाने पाहिल्या आहे. तिसऱ्या लाटेपेक्षा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेदना अत्यंत भयंकर आहेेत. कित्येक दिवस लोकांना लॉकाडाऊनमुळे घरात बसून राहवं लागलं आहे. मात्र आता लसीकरणाचे अस्त्र आपल्याकडे असल्यामुळे दिवसेंदिवस दिलासा मिळत चालला आहे.
लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी
लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून जगातील सर्वच देशांनी लसीकरणावर मोठा भर दिला होता. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भारत थोपवू शकला आहे. जास्तीत जास्त लसीकरण झाल्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव आणि वेदना जास्त जाणवल्या नाहीत. मात्र दुसऱ्या लाटेत भारतात खूप नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्या वेदना अजून ताज्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जसजशी लस उपलब्ध होईल तसतसे प्रशासन लसीकरणावर भर देत होते. आणि गोव्याने यात आघाडी मारत सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे गोवेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रतील पुण्याातूनही जगभरात लस पुरवण्यात आली. आरोग्य विभागानेही लसीकरण मोहिमेत अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का भारतात चढता आहे.
महाराष्ट्र कधी टार्गेट पूर्ण करणार?
महाराष्ट्रातही लसीकरणाचा टक्का अतिशय चांगला आहे. मात्र अद्याप शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालेले नाही. महाराष्ट्रतील शाळा पुन्हा सुरू झाल्याने शासन विद्यार्थ्याचेही लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देत आहे. लोकांनीही जागृतने चांगला प्रतिसाद दिल्यास महाराष्ट्रही लवकरच शंभर टक्के लसीकरण पूर्ण करेल, असा विश्वास आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गोव्याने करून दाखवलं आहे. आता महाराष्ट्रानेही करून दाखवण्याची वेळ आहे. जेवढ्या लवकर लसीकरण पूर्ण होईल, तेवढ्या लवकर परिस्थिती अधिक सुधारत जाणार आहे. त्यामुळे गोव्याच्या पाऊलावर पाऊल टाकतं महाराष्ट्रातलंही लसीकरण 100 ठक्के पूर्ण करण्याची गरज आहे.
साखर पोटात गेल्यावर दाखवते मोठा ‘प्रताप’, मधुमेहापासून ते कर्करोगापर्यंत धोका!
पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? चिंता करु नका! चुटकीसरशी दुखणं गायब करणारा उपाय