आणखी एक ज्योती मौर्य ? पतीने कर्ज काढून पत्नीला शिकवलं पण नोकरी मिळाल्यावर दिला दगा ! प्रियकरासोबत लग्न करण्याचा घेतला निर्णय

| Updated on: Jul 21, 2023 | 10:35 AM

बहुचर्चित Sdm महिला अधिका री ज्योती मौर्य प्रकरणासारखंच आणखी एक प्रकरण समोर आलं असून नोकरी मिळाल्यनंतर शिपाई पत्नीने तिच्या पतीला सोडून प्रियकरासह लग्न करण्याचा निर्णय घेतला असा आरोप पीडित पतीने लावला आहे.

आणखी एक ज्योती मौर्य ? पतीने कर्ज काढून पत्नीला शिकवलं पण नोकरी मिळाल्यावर दिला दगा ! प्रियकरासोबत लग्न करण्याचा घेतला निर्णय
Follow us on

उन्नाव : बरेलीमधील बहुचर्चित महिला अधिकारी ज्योती मौर्य (Jyoti Maurya) प्रकरणाची धग अद्याप शांत झालेली नसतानाच आता तसंच आणखी प्रकरण समोर आलं आहे. लग्नानंतर पत्नीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पतीने कर्ज काढले, ढोर मेहनतही केली आणि पत्नीला शिपाई बनवले. पण ते सर्वकाही विसरून पत्नीने पतीला धोका दिला आणि प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पतीने खूप समजावल्यावरही ती ऐकायला तयार नाहीये.

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अखेर पीडित पतीने पोलिसांकडे धाव घेत गाऱ्हाणे मांडले आहे. घटस्फोट न देताच लग्न करण्यास निघालेल्या पत्नीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्याने केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उन्नावच्या अचलगंज पोलीस स्टेशन हद्दीतील भाऊनीखेडा गावातील रहिवासी विजयपाल सिंहचे 2010 साली छाया हिच्याशी विधीवत लग्न झाले. मात्र आपण सरकारी नोकरी करावी अशी छायाची इच्छा होती. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पती विजयपाल पुढे आले. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी पत्नीला पोलीस भरतीचा अभ्यास करण्यास प्रोत्साहनही दिले. अभ्यास चांगला व्हावा, मार्गदर्शन मिळावे यासाठी उन्नावमध्ये क्लासही लावण्यात आला.

50 हजारांचे काढले कर्ज

पत्नीला चांगले शिक्षण मिळावे, ती ऑफीसर बनावी यासाठी विजयपाल यांनी कठोर मेहनत करण्यास सुरूवात केली. दिवस-रात्र काम करून त्यांनी पै-पै साठवली आणि पत्नीचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली. 2013 मध्ये, छायाने उत्तर प्रदेश पोलिस भरती परीक्षा दिली, त्यामध्ये यश मिळाल्यानंतर 2016 मध्ये तिची महिला कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली. तिच्या प्रशिक्षणादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विजयपाल यांनी 50 हजार रुपयांचे कर्जही काढले आणि ते पैसे छायाला दिले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया या 2019 पासून बाराबंकी जिल्ह्यात तैनात आहेत.

पत्नीवर कारवाई करण्याची विनंती करणारा अर्ज पीडित विजयपाल यांनी पोलिसांना दिला आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, 16 जुलै रोजी छायाने तिच्या प्रियकराशी साखरपुडा केला. घटस्फोट न घेताच ती दुसरं लग्न करत असल्याचा आरोप त्यांनी लावला आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत उन्नावच्या एसपींनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.