मुंबई : देशातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. आतापर्यंत बॅटरीवर धावणाऱ्या इलेक्ट्रीक बसेसचा वापर होत होता. आता त्याच्या पुढचे पाऊल टाकले जाणार असून थेट हायड्रोजन इंधनावरील बसेस भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने (OGL) रिलायन्सच्या सहकार्याने या या हायड्रोजन बसेसची घोषणा आज करण्यात आली आहे. या आधुनिक बसेसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रदुषणमुक्त भारताचे स्वप्न साकार होणार आहे.
आतापर्यंत आपण पारंपारिक इंधनाला पर्याय म्हणून सीएनजी तसेच इलेक्ट्रीक बसेसचा वापर करीत होतो. बॅटरीवर धावणाऱ्या इलेक्ट्रीक बसेस तर आता अनेक महापालिकांच्या परिवहन सेवेत रूजू झाल्या आहेत. परंतू मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ची उपकंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) रिलायन्ससोबत तांत्रिक सहकार्याने या हायड्रोजन बसेस बाजारात उतरविणार आहे. या हायड्रोजन बसेसमधून धूरा एवजी पाण्याचे उत्सर्जन होणार आहे, त्यामुळे प्रदुषण टळणार आहे.
ऑलेक्ट्राच्या कारखान्यात बसेस तयार होणार
या महत्वाच्या कराराने ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) ने सार्वजनिक वाहतूकीतील आपले नेतुत्व पून्हा एकदा सिद्ध केले आहे. नव्या युगाची वाहतूक व्यवस्था ठरणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या हायड्रोजन बसेसचे लवकरच भारतीय बाजारपेठ आगमन होणार आहे. पारंपारिक सार्वजनिक वाहतुकीला या हायड्रोजन बसेस संपूर्ण कार्बनमुक्त करणार आहेत. वायु, जल प्रदुषणाला आळा घालणाऱ्या हायड्रोजनवर चालणाऱ्या या बसेस ऑलेक्ट्राच्या कारखान्यात तयार होणार आहेत.
एकावेळी 400 किमीपर्यंत प्रवास करणार
या उपक्रमामुळे भारत सरकारच्या कार्बनमुक्त हायड्रोजन इंधनाच्या महत्त्वाकांक्षी मोहीमेला बळ मिळणार आहे. 12-मीटरच्या लो-फ्लोअर बसमध्ये ड्रायव्हरचे आसन वगळून प्रवाशांसाठी 32 ते 49 आसनांची सोय असणार आहे. एकदा हायड्रोजनची टाकी फुल्ल केल्यानंतर या बस 400 किमी पर्यंत प्रवास करू शकणार आहेत. या प्रवासाला लागणारा हॉयड्रोजन वायू भरायला फक्त पंधरा मिनिटे लागणार आहेत. या बसेसमध्ये वरच्या बाजूला टाइप-4 हायड्रोजन सिलिंडर बसवलेले असतात. हे सिलिंडर -20 ते +85 अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकतात.येत्या वर्षात या बसेस व्यवसायिक वापरसाठी उपलब्ध करून देण्याचे ऑलेक्ट्राचे उद्दिष्ट आहे.