हरियाणा : नेहमी चर्चेत असणारे हरियानातील सनदी अधिकारी अशोक खेमका यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मागील 30 वर्षात अशोक खेमका यांची ही 55 वी बदली आहे. खेमका यांना आता मुख्य सचिव म्हणून अभिलेखागार विभागात पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्रात तुकाराम मुंडे यांची सतत बदली होत असल्यामुळे ते आता सर्वांनाच परिचित झाले आहेत. मुंडे यांच्यापेक्षाही खेमका यांच्या अधिक बदल्या झालेल्या आहेत. तुकाराम मुंडे यांच्याप्रमाणेच अशोक खेमका हे देखील आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. प्रसिद्ध आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून जशी महाराष्ट्रात तुकाराम मुंडे यांची ओळख आहे अगदी तशीच ओळख अशोक खेमका यांची देखील हरियाणामध्ये आहे. अशोक खेमका हे अधिकारी 2020 मध्ये माजी कॉंग्रेस अध्यक्षा यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या जमीन व्यवहार प्रकरणाच्या चौकशीमुळे देशभरात चर्चेत आले होते. याच काळात अशोक खेमका यांच्या जीवनावर जस्ट ट्रांसफर्ड दी अनटोल्ड स्टोरी ऑफ अशोक खेमका या नावाने बायोग्राफी आली होती. दिल्लीतील भवदीप कंग और नमिता काला यांनी हे लिखाण केले होते.
अशोक खेमका यांच्यावरील या लिखाणामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता, पहिल्यांदाच एखाद्या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यावर अशी बायोग्राफी आली होती.
अशोक खेमका यांची नुकतीच बदली झाली असून ते अभिलेखागार विभागात मुख्य सचिव असणार आहेत, ते 1991 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे.
यापूर्वी अशोक खेमका हे पुरातत्व, पुरातत्व आणि संग्रहालय खात्यात होते, त्यापूर्वी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.
अशोक खेमका हे सेवेत रुजू होण्यापूर्वी 1988 मध्ये IIT खरगपूरमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग टॉपर होते. विशेष म्हणजे सरकारी वाहन जप्त केल्यानंतर घर ते कार्यालय असा पायी प्रवास करत होते.
पाच वर्षात 9 वेळा बदली झाल्याने अशोक खेमका हे सुरुवातीला चर्चेत आले होते, त्यांतर रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी केल्यानंतर ते प्रकाश झोतात आले होते.