आपल्या समाजात अशी काही लोकं असतात जी लोकांना त्यांच्या राहणीमानावरून ओळखले जाते. पण त्यांचा स्वभाव मात्र समजून घेत नाही. एखाद्याचे व्यक्तिमत्व त्याच्या राहणीमानावरून ओळखता पण ती व्यक्ती तिच्या ज्ञानाने किती मोठी आहे हे ओळखू शकत नाही. तुम्ही लोकांनी एक इंग्रजीत म्हण ऐकलीच असेल ‘डॉन्ट जज ए बुक बाय इट्स कवर’ म्हणजे एखाद्या पुस्तकाचे कव्हर बघून त्याचे मूल्यमाप करू नये. कारण कोणतीच गोष्ट जी बाहेरून जशी दिसते तशी आतून कधीच नसते. परंतु अशी काही लोक आहेत जी अनेकांना त्याच्या कपड्यांवरून त्याच्या राहणीमानावरून त्यांची तुलना करतात आणि ती व्यक्ती गरीब आहे की श्रीमंत आहे हे ठरवतात. त्यात समाजात त्या व्यक्तीला वागणूक देखील तशीच देतात.
कधी कधी व्यक्तीच्या दिसण्यावर जाण्यापेक्षा त्यांच्याकडे असलेल्या कलेचे ज्ञानाचे महत्व समजा. समाजात असे खूप लोकं आहेत जी साधेपणाने वावरत असतात. पण त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही कि ती व्यक्ती एवढ्या मोठ्या स्थरावर काम करून मोठं यशस्वी प्राप्त केल आहे. यातच असाच काहीसा प्रकार राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील श्रीमाधोपूर येथील एका महिलेसोबत घडला आहे. काय आहे हा नेमका प्रकार ते जाणून घेऊयात.
राजस्थान मधील एका महिलेचा तिच्या साध्या राहणीमानावरून गावातील लोकं तिला अशिक्षित समजत होते. तसेच त्यांच्या समाजात या महिलेने तिने परिधान केलेले साध्या कपड्यांवरून तिच्याकडे एक साधी आणि न शिकलेली फक्त चूल आणि मुलं सांभाळणारी अश्या दृष्टिकोनातून पहिले जात होते. मात्र, जेव्हा त्या लोकांना या महिलेचे खरे वास्तव कळले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन घसरली. प्रत्यक्षात ही महिला आयएएस अधिकारी असल्याचे समजले झाले. मोनिका यादव असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे.
मोनिका २०१४ मध्ये आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाली. तेव्हापासून त्या देशाची सेवा करत आहेत. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोत ती राजस्थानी वेशभूषेत दिसत असून मांडीवर एक छोटं बाळ देखील आहे. त्याचा हा फोटो पाहून ही महिला आयएएस अधिकारी आहे याचा अंदाजही कोणी लावू शकत नाही. एकीकडे काही आयएएस अधिकारी आपल्या पदावर राहिल्यानंतर सर्वांशी नीट बोलतही नाहीत, तर दुसरीकडे मोनिका आपल्या समाजाची आणि राज्याची संस्कृती जपत वेशभूषेचा आदर करून संपूर्ण देशात एक आदर्श निर्माण करत आहे.
राजस्थानच्या या आयएएस अधिकारी महिलेचा साधेपणा पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच्या या व्हायरल फोटो आणि त्यांच्यातील साधेपणामुळे त्या अनेकांच्या चाहते झाले आहेत. मोनिका यादव यांचे बालपण गावातच गेले. येथे वाढूनही त्याने २०१४ मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आई-वडिलांचे नाव उंचावले. आयएएस झाल्यानंतर त्यांनी आयएएस अधिकारी सुशील यादव यांच्याशी लग्न केले. त्यानंतर त्यांना एक गोड मुलगी झाली जी या व्हायरल फोटोत त्याच्या मांडीवर दिसत आहे. मोनिका सध्या डीएसपी म्हणून कार्यरत आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्या भागात काही समस्या निराम होते तेव्हा त्या ताबडतोब त्या समस्या सोडवतात. त्यांनी त्याच्या या क्षेत्रात चांगले काम आणि चांगली आयएएस अधिकारी म्हणून प्रथम पारितोषिकही पटकावले आहे.
मोनिका यांचे वडीलही आयआरएस अधिकारी आहेत. अशा तऱ्हेने मोनिका या ही लहानपणापासूनच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न पाहिले होते. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा निर्णय त्यांनी फार पूर्वीच घेतला होता. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर २०१४ साली त्याने यशाच शिखर गाठलं. तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही आणि सर्वस्व देशाच्या सेवेत झोकून दिले. यावेळी त्यांनी देशाची संस्कृती आणि प्रतिष्ठेची ही पुरेपूर काळजी घेतली. एवढ्या मोठ्या पदावर असूनही त्यांना आजही साधेपणाने जगायला आवडतं.