भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने गेल्यावर्षी 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान -3 ची यशस्वी लॅंडींग करुन इतिहास रचला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत जगातला पहिला देश बनला. त्यानंतर संपूर्ण जगातल्या संशोधकांनी भारतीय संशोधकांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इस्रो येथे जाऊन इस्रोच्या टीमचे अभिनंदन केले. चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जेथे लॅंड झाले त्या जागेला शिव शक्ती पॉईंट ठेवण्यात आले. आता या मोहिमेच्या बाबतीत एक आनंदाची बातमी आली आहे. याबातमीमुळे इस्रोच्या संशोधकांना आनंद झाला आहे. काय आहे ही बातमी…
चंद्राच्या आपल्याला कधीही न दिसणाऱ्या बाजूवर आता पर्यंत कोणत्याही देशांनी चंद्रयान उतरविण्याचे धाडस केले नव्हते. चंद्राचा दक्षिण ध्रुवावरील जमिन अधिकच खडक आणि विवरांनी भरलेली आहे. त्यामुळे येथे यान उतरविणे तुलनेत अधिक अवघड होते. तरीही हे आव्हान इस्रोच्या संशोधकांनी पेलत येथे यशस्वी लॅंडींग केले होते. चंद्रावर जेथे चंद्रयान – 3 यशस्वी लॅंडींग झाले त्या भागाला शिव शक्ती पॉइंट असे नाव देण्यात आले होते. आता त्याच संदर्भातील बातमी आली आहे. वास्तविक इंटरनॅशनल एस्ट्रोनॉमिकल युनियनने ( IAU ) 19 मार्च रोजी शिव शक्ती नावाला अखेर मान्यता दिली आहे.आता अधिकृतपणे चंद्रावर ज्या जागी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चंद्रयान-3 यान उतरविले त्या जागेला जगभर शिव शक्ती पॉइंट नावाने ओळखले जाणार आहे.
ग्रहांच्या नामकरणाच्या संदर्भातील गॅझेटीयरच्या मते ग्रहांच्या सिस्टीमला नामकरणासाठी आयएयू वर्कींग ग्रुपने चंद्रयान-3 च्या विक्रम लॅंडरच्या लॅंडींग साईटच्या शिव शक्ती नावाला अखेर मंजूरी दिली आहे. कोणत्याही अंतराळातील ठिकाणाची ओळख पटण्यासाठी त्याचे नामकरण करणे गरजेचे असते. त्यामुळे भविष्यात त्या जागेला सहज शोध घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे जगभर आता शिव शक्ती पॉईंटला ओळख मिळणार असून भारतीय इस्रोच्या संशोधकांना ओळख मिळणार आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅंडींग झाल्यानंतर तीन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरु येथे जाऊन या नावाची घोषणा केली होती.
चंद्रयान -3 च्या लॅंडींगच्या जागेला ‘शिवशक्ती पॉइंट’ असे नाव दिले असले तर साल 2019 चंद्रयान-2 क्रॅश होऊन जेथे लॅंडींग करताना अपयशी ठरले होते. त्या जागेला देखील वेगळी ओळख मिळाली होती. त्या जागेला ‘तिरंगा’ असे नाव देण्यात आले होते. 23 ऑगस्ट हा दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा करण्याची घोषणा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.