2 हजार रुपयाची नोट बदलण्यासाठी सादर करावे लागणार ओळखपत्र ? हे खरं की खोटं पाहा

| Updated on: May 22, 2023 | 2:12 PM

उद्यापासून बॅंकांमध्ये दोन हजाराची नोट बदलून मिळणार आहे. मात्र या दोन हजाराच्या नोटा बदलताना ओळखपत्र दाखवावे लागणार आहे का ? यावर आरबीआयचे गव्हर्नर यांनी काय म्हटलं आहे पाहा...

2 हजार रुपयाची नोट बदलण्यासाठी सादर करावे लागणार ओळखपत्र ? हे खरं की खोटं पाहा
Two Thousand Rupees Note Demonetization
Follow us on

मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटा उद्या 23 मे पासून बॅंकांमध्ये बदलता येणार आहेत. मात्र या नोटा बदलताना ओळखपत्र दाखवावे लागणार की नाही यावर गोंधळ असताना आरबीआयच्या गव्हर्नर यांचे वक्तव्य पुढे आले आहे. या गोंधळावर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की, नोटा बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. नोटा बदलताना नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भिती बाळगण्याची गरज नाही. जर तुमच्याकडेही 2 हजार रुपयांची नोट असेल आणि ती बदलण्यासंदर्भात तुम्हालाही काही प्रश्न पडले असतील, तर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सर्वसामान्यांची मनातील भीती दूर करीत मोकळेपणे त्यांच्या शंकांचे निरसन केले आहे.

नागरिकांनो चिंता करण्याची गरज नाही

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले, नागरिकांनी दोन हजाराच्या नोटा बदलण्यासंदर्भात कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नोट बदलण्यासाठी पूर्ण चार महिने म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. यामुळे बँकेत जाऊन गर्दी करु नका असेही त्यांनी सांगितले. शक्तीकांत दास पुढे म्हणाले की काही लोक अशीही अफवा पसरवत आहे, की बँकेत दुसऱ्या नोटा संपून जातील, तर आमच्याकडे दुसऱ्या किंमतीच्या नोटा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आरबीआयने दिलेल्या आदेशात म्हटल्याप्रमाणे मंगळवारपासून कोणत्याही बॅंकांच्या कोणत्याही ब्रांचमधून नागरिक आपल्या दोन हजारांच्या नोटा बदलू शकतात.

एका वेळी दहाच नोटा बदलता येणार

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास पुढे बोलतांना म्हणाले की एका वेळी 2 हजार रुपयाच्या जास्तीत जास्त 10 नोटा बदलता येतील. म्हणजेच एका वेळी 20 हजार रुपयांपर्यंतच्या दोन हजाराच्या 10 नोटाच बदलता येतील आणि यासाठी कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. 2 हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय ‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला, यानुसार 2000 च्या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत बदलता येऊ शकतात.