वडिलांना काही झाले तर दिल्लीची खुर्ची… ‘या’ नेत्याच्या मुलीचा नेमका इशारा कुणाला ?

| Updated on: Mar 07, 2023 | 6:06 PM

माझ्या वडिलांना हे लोक त्रास देत आहेत. ही गोष्ट चांगली नाही. त्यांना काही झाले तर मी कुणालाही सोडणार नाही. आम्ही हे सर्व लक्षात ठेवू. वेळ सर्वांची येत असते. त्यात मोठी शक्ती असते हे लक्षात ठेवावे. माझ्या वडिलांना काही झाले तर दिल्लीची खुर्ची हादरवून सोडू.

वडिलांना काही झाले तर दिल्लीची खुर्ची... या नेत्याच्या मुलीचा नेमका इशारा कुणाला ?
PM NARENDRA MODI
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

पाटणा : राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची सीबीआयने त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी काल सुमारे पाच तास चौकशी केली. त्यांनतर आज मंगळवारी पाच सीबीआय अधिकाऱ्यांची टीम दोन कारमधून मीसा भारती यांच्या पंडारा पार्क येथील निवासस्थानी पोहोचली. पंडारा पार्क येथे लालू प्रसाद यादव रहात असून हे अधिकारी त्यांच्या चौकशीसाठी पोहोचले. लालू प्रसाद यादव हे 2004 ते 2009 दरम्यान रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांनी जमीन भेट देण्याच्या बदल्यात अनेकांना नोकरी दिली असा आरोप त्यांच्यावर असून याच प्रकरणी सीबीआयने त्यांची चौकशी सुरु केली आहे.

सीबीआयने याच प्रकरणात लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि इतर 14 जणांविरुद्ध गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींखाली आरोपपत्र दाखल केले आहे. सर्व आरोपींना 15 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, तपासाचा पुढील भाग म्हणून ही चौकशी केली जात आहे. यामधून अधिक नेमका किती पैशांचा व्यवहार झाला आणि यात कोण कोण सामील होते याची माहिती घेतली जात आहे असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले. मात्र, त्यानंतर लालू प्रसाद यादव आजारी पडले. अजूनही ते आजारी असून अशा परिस्थितीत त्यांची चौकशी करण्यासाठी सीबीआय घरी पोहोचली. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य खूपच संतापली आहे. रोहिणी यांनी ट्विट करत थेट सीबीआयलाच इशारा दिला आहे.

माझ्या वडिलांचा छळ केला जात आहे. त्यांना काही झाले तर मी कुणालाही सोडणार नाही. आमची सहनशीलता आता संपली आहे. माझ्या वडिलांना काही झाले तर दिल्लीची खुर्ची हादरवून टाकू असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, लालू प्रसाद यादव यांचे धाकटे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ‘केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सातत्याने आम्ही विरोध करत आहोत आणि त्यामुळेच सीबीआयचे पथक माजी रेल्वे मंत्री यांच्या निवासस्थानी पोहोचले’ असा आरोप केला आहे.