रशियाचं हे बॉम्बर भारताला मिळालं तर चीनची ही शहरं येतील रेंजमध्ये, काय आहे वैशिष्ट्ये याचं ?

| Updated on: Nov 14, 2024 | 6:04 PM

रशिया आपल्या स्ट्रॅटेजिक बॉम्बवर्षक Tu-160 व्हाईट स्वान या बॉम्बर विमानाला भारताला विकण्याची तयारी करीत आहे. या बॉम्बरला जर भारताने विकत घेतले तर भारताची ताकद प्रचंड वाढणार आहे. कारण चीन आणि पाकिस्तान सारख्या शेजाऱ्यांमुळे भारताला बॉम्बर विमानांची गरज आहे.

रशियाचं हे बॉम्बर भारताला मिळालं तर चीनची ही शहरं येतील रेंजमध्ये, काय आहे वैशिष्ट्ये याचं ?
Follow us on

रशियाने भारताला त्यांच्या सर्वात ताकदवान बॉम्बवर्षक Tu-160 या बॉम्बर विमानाच्या खरेदीच्या प्रस्ताव ठेवला आहे. भारताकडे सध्या एकही बॉम्बर विमान नाही. या रशियन बॉम्बर विमानाची खेरदी जर भारताने केली तर या विमानाने बॉम्ब, हायपरसॉनिक मिसाईल, तसचे क्रुझ मिसाईल देखील डागणे शक्य होणार आहे.  रशियाचे Tu-160 या लांबपल्ल्याच्या बॉम्बवर्षक विमानाला व्हाईट स्वान ( White Swan ) असेही म्हटले जाते. हे बॉम्बर शत्रूंच्या मुलखात जाऊन कामगिरी बजावून परत येण्यात माहीर आहे. तेही अगदी शांतपणे आपली कामगिरी करुन पुन्हा माघारी येते. तुपोलेव टीयू – 160 ब्लॅक जॅक बॉम्बवर्षक ( Tupolev Tu-160 Black Jack Bomber) खासियत काय आहे हे पाहूयात…

Tu-160 हे एक सुपरसॉनिक व्हॅरिएबल स्वीप विंग हेव्ही स्टॅटेजिक बॉम्बर आहे. याचे डिझाईन 1970 मध्ये सोव्हीएत संघाच्या के तुपोलेव्ह यांनी केले होते. याचे उड्डाण डिसेंबर 1981 मध्ये झाले होते. 1987 पासून हे विमान रशियन एअरोस्पेस फोर्समध्ये तैनात आहे.टीयू 160 बॉम्बरचे 9 टेस्ट प्लेन तयार करण्यात आले होते.

रशियाकडे सध्या 16 बॉम्बर आहेत

साल 2016 पासून आतापर्यंत रशियन एअर फोर्समध्ये लॉंग रेंज एव्हीएशन ब्रॅंचमध्ये 16 विमाने दाखल आहेत. रशियन सैन्यात 50 नवीन टीयू 160M बॉम्बर्सना सामिल करण्याची योजना आहे. या विमानाचे उड्डाण चार जण मिळून करतात. यात पायलट, को-पायलट, बमबॉर्डियर आणि डफेंसिव्ह सिस्टीम ऑफीसरचा समावेश आहे. हे विमान 177.6 फूट लांबीचे आहे.

हे सुद्धा वाचा

या व्हाईट स्वान विमानाचा विंग स्पॅन 182.9 फूट आहे. उंची 43 फूट आहे. रिकाम्या विमानाचे वजन 1.10 लाख किलोग्रॅम आहे. तर 40,026 फूट उंचीवर हे विमान कमाल दर ताशी 2220 किलोमीटर वेगाने उडू शकते. या विमानाला दर तास 960 किलोमीटर वेगाने सर्वसाधारण पणे उडविले जाते. एका वेळी हे विमान 12300 किलोमीटरपर्यंत उडू शकते.

या विमानाची कॉम्बॅट रेंज 2000 किलोमीटर असते. ज्यास सबसॉनिक गती वाढवून 7300 किलोमीटरने उडविता येते. हे विमान 52 हजार फूट उंचावर जाऊ शकते. याची आकाशात झेप घेण्याची गती 14 हजार फूट प्रति मिनिट आहे. म्हणजे एका मिनिटात सवा चार किलोमीटर उंची ते गाठू शकते. या टीयू-160 विमानात 45 हजार किलो वजनाचे बॉम्ब घेऊन ते उडू शकते.याच्या आत दोन रोटरी लॉंचर्स आहेत. प्रत्येक लॉंचर्समध्ये सहा raduga kh55sm/101/101/555 क्रूज मिसाईल लोड करता येतात. किंवा 12 AS-16 किकबॅक शॉर्ट रेंज आण्विक मिसाईल स्टोअर करता येतात.

चीनसाठी काय रणनीती

जर अशा प्रकारची सहा – सहा विमाने नागपूर आणि तंजावूरमध्ये तैनात केली तर हे विमान एका वेळी चीन वा पाकिस्तानपर्यंत उड्डाण घेऊ शकते. यांना हिमाचल,बिहार, आसाम, नागालॅंड, अरुणाचल प्रदेशमध्ये तैनात केले तर चीनच्या कोणत्याही शहरात जाऊन ते बॉम्ब डागू शकते. यात ज्या रेंजची मिसाईल लोड केली जाईल त्या आधारे ते उड्डाण करेल. जर दक्षिण भारतात याला तैनात केले तर हिंद महासागरातील चीनच्या हालचाली बंद होतील. याच्या मदतीने चीनच्या नौदलाला टार्गेट केले जाऊ शकते.