मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : लवकरच राज्यसभेच्या निवडणूका होणार आहेत. कॉंग्रेसच्या वाट्याला 10 जागा आहेत. कॉंग्रेसचे आमदार मिलिंद देवरा यांच्या पावलांवर पाऊल टाकत वांद्रे पश्चिम येथील आमदार बाबा सिद्धीकी यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाण्याची तयारी चालविली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. लवकरच राज्यसभेच्या निवडणूका आहेत. त्यामुळे आणखी आमदार गळाले तर राज्यसभेतील कॉंग्रेसचे गणित बिघडू शकते. कॉंग्रेसला हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्रातून प्रत्येकी एक, तेलंगणातून दोन आणि कर्नाटकातून तीन राज्यसभेच्या जागा मिळणार आहेत. त्यासाठी डझनभर उमेदवार गुडघ्याला बाशिंग बाधून उभे आहेत. परंतू कॉंग्रेस पक्ष लोकसभा निवडणूकीला जो फायदेशीर ठरेल त्यालाच ज्येष्ठांच्या सभागृहाचे दरवाजे उघड करणार आहे.
सोनिया गांधी / प्रियंका गांधी : हिमाचल प्रदेश
अजय माकन / अरुण यादव : मध्य प्रदेश
जितेंद्र सिंह / अभिषेक मनु सिंघवी : राजस्थान
अखिलेश प्रसाद सिंह : बिहार
पवन खेडा : महाराष्ट्र
नासिर हुसेन : कर्नाटक
श्रीनिवास बि.व्ही. : कर्नाटक
सुप्रिया श्रीनेत : कर्नाटक
कॉंग्रेसकडे आता 44 आमदार आहेत. त्यातील एक आताच गळाला आहे. राज्यसभेच्या एका सीटसाठी 42 आमदारांची गरज आहे. बाबा सिद्धीकी यांच्यानंतर झिशान देखील पार्टी सोडू शकतात. त्यामुळे दोन आमदार आणखी गळाले तर कॉंग्रेसचा राज्यसभेतील उमेदवार अडचणीत येणार आहे.
कर्नाटकात कॉंग्रेसच्या जवळ 135 आमदार आहेत. आणि राज्यसभेतील एका उमेदवारासाठी 45 मतांची गरज आहे. जर एक उमेदवार जरी फुटला तर राज्यसभेतील तिसरा उमेदवार अडचणीत येणार आहे.
तेलंगणा आणि कर्नाटकातील पाच पैकी कमी कमी चार जागा स्थानिय नेत्यांना मिळणार आहे. सूत्रांच्या मते लोकसभा निवडणूकांसाठी पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात तेलंगणा आणि कर्नाटक 30 जागा कॉंग्रेस जिंकू शकते. त्यामुळे राज्यसभेत स्थानिक उमेदवारांला संधी देणे ही पक्षाची मजबूरी आणि गरज दोन्ही आहे.
राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ ओडीसात पोहचली आहे. या यात्रेतून ब्रेक घेऊन राहुल गांधी मंगळवारी सायंकाळी 4 वाजता दिल्लीत पोहचणार आहेत. पुढील दोन दिवस त्यांचा मुक्काम दिल्लीतच असणार आहे. यावेळी ते राज्यसभेच्या उमेदवारांच्या अंतिम निवडी संदर्भात बैठकीत निर्णय घेणार आहेत.