नवी दिल्ली : उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून गारपिटीसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर हवामानातील बदलामुळे जिथे लोकांना ज्या ठिकाणी उष्णतेचा सामना करावा लागला नाही त्या ठिकाणी मात्र अतिवृष्टीसह झालेल्या गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दिल्लीतील काही भागात आज संध्याकाळीही हलक्या सरीचा पाऊस झाला. आजच्या दिवसाबरोबरच हवामान खात्यानेही 4 एप्रिल रोजीही दिल्लीसह काही भागात हलक्या सरीचा पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तर दुसरीकडे उर्वरित उत्तर भारतात हळूहळू हवामानात बदल होऊन आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिवसभराच्या विश्रांतीनंतर राजधानी दिल्लीसह वेगवेगळ्या परिसरात जोरदार पाऊस झाला. आज सकाळपासूनच ढग दाटून आले होते.
दिल्लीतील सफदरजंग वेधशाळेच्या अनुमानानुसार दिल्लीत हलक्या सरीचा पाऊस कोसळणार असल्याचे म्हटले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरातील किमान तापमान 16.8 अंश सेल्सिअसवर स्थिरावले असून उद्याही हलक्या सरीसह मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.
Rainfall/thunderstorm with hailstorm activity likely over Northwest India today and significant reduction thereafter. pic.twitter.com/Fa16VJwYpb
— India Meteorological Department (@Indiametdept) April 3, 2023
दिल्लीसह हिमाचल प्रदेशातील काही भागात पाऊस आणि हिमवृष्टीसह आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 तारखेनंतर पावसाचे प्रमाण कमी होणार असले तरी त्यानंतरही काही ठिकाणी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये 4 एप्रिल रोजी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दिल्लीसह आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील 5 दिवसांत काही भागात पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पावसाविषयी आयएमडीकडून सांगण्यात आले आहे की, एप्रिल ते जून या काळात भारतातील काही भाग वगळता बहुतांश भागात तापमान अधिक उष्ण राहणार आहे.
तर बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.