देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका कमी झाला असून, तापमानात वाढ झाली आहे. सरासरी तापमान वाढलं आहे.
यावर्षी उन्हाळ्याची चाहूल लवकच लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील आता तापमान वाढलं आहे. थंडीचा कडाका कमी झाला आहे.
मात्र अचानक बदललेल्या या वातावरणाचा फटका देशातील काही राज्यांना बसण्याची शक्यता आहे. आयएमडीकडून पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीकडून पुढील दोन दिवस पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
एवढंच नाही तर अतिमुसळधार पावसासोबतच वादळी वाऱ्याची देखील शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आयएमडीच्या इशाऱ्यानंतर पंजाब सरकार अलर्ट मोडवर असून, शेतकऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे, तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना तेथील नागरिकांना देण्यात आल्या आहेत.