मुंबई : (Monsoon) मान्सून हा अनिश्चित आणि अनियमित स्वरुपाचा असला तरी त्याच्या असण्याने आणि नसण्याने थेट (Impact on the economy) अर्थव्यवस्थेवरच परिणाम होऊ शकतो. आता मान्सूनचा पाऊस आणि अर्थव्यवस्था यांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या (Agricultural) शेती व्यवसायाचा खरा आधार हा मान्सूनच आहे. त्याच्या आगमनावरही सर्वकाही अवलंबून आहे. भारतातील ग्रामीण भागातील बहुसंख्यलोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. मान्सून आणि शेती या दोन गोष्टींचा घनिष्ठ संबंध आहे. इतकेच नव्हे तर कृषी क्षेत्राचा डोलाराच हा मान्सूनवर उभा आहे. शेतीचे भवितव्यतच हे मान्सूनच्या वेळापत्रकाप्रमाणे चालते.
‘स्कायमेट’ हा हवामान संस्थेने यंदा मान्सून हा सामान्य राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच यंदा सरासरीच्या तुलनेत 94 ते 104 टक्के पाऊस बरसणार आहे. जर मान्सूनची स्थिती सामान्य राहिली तर शेती उत्पादनात वाढ ही ठरलेली आहे. गेल्या काही वर्षात नियमित आणि वेळेत नाही पण सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने शेती उत्पादनात वाढ ही झालेलीच आहे. यंदा तर अधिकच्या पावसामुळे उन्हाळी पिकेही शक्य झाली होती. त्यामुळे मान्सूनच्या केवळ वातावरणावरही बरेच काही अवलंबून आहे.
यंदा मान्सून सामान्य तर राहणारच आहे पण वेगळेपण म्हणजे तो वेळेत दाखल होत आहे. याचा देखील शेती उत्पादनावर आणि शेती व्यवसायावर परिणाम होत असतो. केवळ वेळेत मान्सून दाखल झाल्यामुळे वेळेत खरिपाच्या पेऱण्या होऊन उत्पादनात वाढ देखील शक्य आहे. जर पावसाने हुलकावणी दिली तर मात्र, दुबार पेरणी, उत्पादनात घट, उत्पादनावर अधिकचा खर्च यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मान्सूनच्या पावसावरच शेती व्यवसाय आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्था अवलंबून आहे.
देशातील निम्म्याहून अधिक जनतेचा उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मान्सूनच्या अंदाज केवळ शेती व्यवसायाला उभारी देण्यासाठी महत्त्वाचा आहे असे नाही तर यामुळे इतर उद्योगधंदे देखील अप्रत्यक्षरीत्या प्रभावित होत असतात. शेती क्षेत्रातील कोणताही घटक असो त्यावर पावसाचा प्रभाव कायम राहिलेला आहे. शेतीच्या उत्पदनात वाढ होण्यासाठी मान्सून सामान्य किंवा सामान्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.