चेन्नई | 11 मार्च 2024 : आपल्या देशात श्रद्धा आणि भावनेपोटी भाविक कोणतीही किंमत मोजायला तयार होतात. इरोड येथील एका मंदिरात एका लिंबाला तब्बल 35 हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. इरोडपासून 35 किमी अंतरावर असलेल्या शिवगिरी गावाजवळ असलेल्या पाझापौसियन मंदिरात भगवान भोलनाथाला अर्पण केलेल्या लिंबांसह इतर वस्तूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात लिंबाला तब्बल 35 हजाराचा बोली लागली. एका भक्ताने हा लिलाव जिंकला आहे. ज्या व्यक्ती लिंबूला सर्वात जास्त बोली लावतात त्याला पुढील वर्षांत धन आणि चांगले आरोग्य मिळते अशी श्रद्धा आहे.
गेल्या शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त इरोडपासून 35 किमी अंतरावरील शिवगिरीजवळच्या पाझापौसियन मंदिरात शिवाला अर्पण केलेल्या लिंबांसह इतर फळांचा आणि इतर वस्तूंचा लिलाव करण्यात आला.या लिलावात 15 भाविकांनी सहभाग घेतला होता. इरोड येथील एका भाविकाने लिंबासाठी सर्वाधिक 35,000 रुपयांची बोली लावली. मंदिराच्या पुजाऱ्याने मंदिरात उपस्थित देवतेसमोर लिंबू ठेवले आणि छोटी पूजा केल्यानंतर या लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्या भक्ताला ते लिंबू आशीवार्द म्हणून देण्यात आले.