बारपेटा : आई आणि मुलाचं नातं जन्मापासून नव्हे, तर जन्माआधीपासूनच अधिक घट्ट असते. त्यामुळे मुलाला जन्म दिल्यानंतर त्या नवजात बाळाचा चेहरा कधी पाहतेय, याची प्रचंड ओढ प्रत्येक मातेला असते. अशावेळी जर जन्म दिलेले मूल आपल्यापासून काही क्षण नव्हे, काही काळ नजरेसमोर नसेल तर…? ही कल्पनाच अस्वस्थ करणारी आहे. आसामच्या बारपेटा जिल्ह्यातील एका हॉस्पिटलमध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला. हॉस्पिटलने चुकून (By mistake) नवजात बाळा (Infant)ला त्याच्या खर्या आईऐवजी दुसर्या महिलेच्या ताब्यात दिले. ते बाळ त्या महिलेच्या कुशीत एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल तीन वर्षे (Three Years) राहिले. पण नियतीने अखेर त्या बाळाला खरी आई म्हणजेच जन्मदात्रीची भेट घडवून दिली. तीन वर्षांनंतर बाळाला जन्मदात्री भेटली. पोटच्या मुलाला पाहताच त्या जन्मदात्रीच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला.
3 years after hospital switched her newborn, woman reunited with son
हे सुद्धा वाचाRead @ANI Story | https://t.co/Yps3xD3GUJ#Assam pic.twitter.com/l7HO0OxPI5
— ANI Digital (@ani_digital) June 10, 2022
आसामधील बारपेटा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात तीन वर्षापूर्वी दोन गरोदर महिला प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. नजमा खानम आणि नजमा खातून या दोघीही एकाच वॉर्डमध्ये दाखल होत्या. यापैकी एका महिलेने मेलेल्या बाळाला जन्म दिला तर दुसऱ्या महिला नजमा खानम यांनी सुदृढ बाळाला जन्म दिला. मात्र प्रसुतीच्या चार तासांनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नजमा यांचे बाळ दुसऱ्या महिलेच्या ताब्यात दिले. तर दुसऱ्या महिलेचे मयत मूल नजमा यांच्या नातेवाईकांकडे दिले. दोघी महिलांच्या नावात साम्य असल्यामुळे ही चूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
अॅड. अब्दुल मन्नन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नजमा यांच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की नजमा यांनी एका सुदृढ बालकाला जन्म दिला असून ते बालकाचा मृत्यू झालेला नाही. त्यानंतर तीन दिवसांनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयातील प्रसुती झालेल्या महिलांची यादी चेक केली. या यादीमध्ये दोन महिलांची नावात साम्य आढळून आले, नजमा खानम आणि नजमा खातून. दोघींनीही दोन बालकांना जन्म दिला. त्यापैकी एका बालकाचा मृत्यू झाला होता. यानंतर खानम कुटुंबीयांनी बारपेटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत याप्रकरणी तपास करण्याची विनंती पोलिसांना केली.
याप्रकरणी बारपेटा पोलीस ठाण्यात कलम 120 (बी) आणि 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी 8 ऑक्टोबर 2020 रोजी डीएनए चाचणीसाठी बारपेटा न्यायालयात याचिका दाखल केली. या डीएनए चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार सदर बाळ त्याच्या खऱ्या आईकडे सुपूर्द करण्यात आले. दोन्ही महिलांच्या नावात साम्य असल्याने भूलचुकीने ही घटना घडल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.