बिहार : आतापर्यंत तुम्ही लग्न अधिक बघितली असाल, बिहारमध्ये (Bihar) झालेल्या लग्नाची सगळीकडं चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे ही दोन लग्नाची गोष्ट आहे. चर्चेचा विषय म्हणजे या दोन्ही विवाहांमध्ये एकाची पत्नी दुसऱ्याशी, तर दुसऱ्याची पत्नी पहिल्याशी विवाहित आहे. मिळालेली माहिती अशी आहे, एकाने दुसऱ्याच्या बायकोला पळवून नेलं होतं, त्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये (bihar police) आहे. ज्यावेळी पळून गेलेली पत्नी मिळाली नाही. तेव्हा बायको पळून गेलेल्या व्यक्तीच्या बायकोशी त्याचे प्रेम संबंध जुळाले, तो त्याच्या पत्नीला घेऊन पळून गेला. त्यानंतर दोघांनीही लग्न केलं. ही प्रेम कहाणी (bihar viral love story) जेव्हा लोकांना माहित झाली, तेव्हा मात्र चर्चा वाढली.
या सगळ्या प्रकरणात मुलांची वाटणी अधिक महत्त्वाची ठरली आहे. एकाला चार मुलं आहेत, तर दुसऱ्याला दोन मुलं आहे. दोघांचे मिळून एकूण ६ मुलं आहेत. आता दोघांनी तीन-तीन मुलं वाटून घेतली आहेत. त्यापैकी एकजण तीन मुलं पळून जाताना घेऊन गेला होता. त्याचबरोबर दुसरा त्याची दोन मुलं जाताना घेऊन गेला होता.
हे प्रकरण मागच्या वर्षीचं आहे. खगड़िया परिसरात हे प्रकरण घडलं असून पसराहा पोलिस स्टेशनला तक्रार झाल्यानंतर सगळीकडं या प्रकरणाची चर्चा झाली होती. मुकेशला नीरजची पत्नी रुबीवरती प्रेम झालं होतं. हे प्रेम प्रकरण अधिक दिवस चालू असल्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी मुकेश रुबीला घेऊन पळून गेला. त्याचबरोबर काही दिवसांनी त्याने तिच्यासोबत लग्न केलं.
त्यानंतर नीरजने मुकेशच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. नीरजने बायकोला खूप शोध घेतला, परंतु बायकोचा शोध लागत नसल्यामुळे मुकेशने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानंतर नीरजने मुकेशच्या बायकोवरती प्रेम करायला सुरुवात केलं. दोघांची मन जुळल्यानंतर 18 फेब्रुवारीला नीरज मुकेशच्या पत्नीला घेऊन पळून गेला. त्यानंतर दोघांनी एका मंदीरात लग्न केलं.
दोघांनी एकमेकांच्या बायकांसोबत लग्न केल्यामुळे दोघांची सगळी चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर दोघंही आता सुखाने संसार करीत आहेत.