Covid 19 : वाढता वाढता वाढे… ! या 5 राज्यांत हात-पाय पसरतोय कोरोना, जाणून घ्या तुमच्या राज्यात काय स्थिती ?

| Updated on: Apr 03, 2023 | 3:05 PM

Covid In India : तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आणखी काही दिवस कोरोनाची प्रकरणे आणखी वाढू शकतात. अशा परिस्थितीत लोकांनी गाफील राहू नये.

Covid 19 : वाढता वाढता वाढे... ! या 5 राज्यांत हात-पाय पसरतोय कोरोना, जाणून घ्या तुमच्या राज्यात काय स्थिती ?
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. आता गेल्या आठवडाभरापासून प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ (cases increased) होत आहे. चिंतेची बाब म्हणजे पॉझिटिव्हिटी रेटही (positivity rate) मोठ्या प्रमाणा वाढत आहे. सध्या देशातील पाच राज्यांमध्ये या विषाणूची व्याप्ती वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कोविडचा आलेख वेग पकडत आहे. या पाच राज्यांमध्ये सक्रिय प्रकरणे (active cases) , सकारात्मकता दर आणि मृत्यू दर वाढत आहे. कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळमध्ये (kerala) आहेत. या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 5636 आहे. यानंतर महाराष्ट्रात (3488), गुजरात (2322), कर्नाटक आणि 1395 दिल्लीत 1410 सक्रिय रुग्ण आहेत.

देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी (20219) 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण फक्त या पाच राज्यांतील आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्रातही कोविडचा सकारात्मकता दर सातत्याने वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये कोविडचे सकारात्मक प्रमाण देशात सर्वाधिक आहे. राजधानीत संसर्ग दर सुमारे 17 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या तीन दिवसांत हा दर 5टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दिल्लीतही नवीन प्रकरणे वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दररोज 400 हून अधिक नवीन केसेस येत आहेत. महाराष्ट्रातील दिल्ली आणि मुंबईतही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. पण दिलासादायक बाब ही आहे की, रुग्णांमध्ये फारशी गंभीर लक्षणे दिसत नाहीत.

का वाढतायंत केसेस ?

तज्ञांचे म्हणणे आहे की Omicron चा XBB.1.16 हा व्हेरिअंट हे देशातील कोविड प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे. हा प्रकार बहुतांश राज्यांमध्ये पसरत आहे. आतापर्यंत 650 केसेस दाखल झाल्या आहेत. हा नवा व्हेरिअंट लोकांना संक्रमित करत आहे. विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, ते सहजच त्याला बळी पडत आहेत.

वरिष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आता काही दिवस कोविडची प्रकरणे वाढतील. ज्या लोकांमधील व्हायरसविरुद्धची अँटीबॉडीज नष्ट झाली आहेत त्यांना संसर्ग होऊ शकतो. यानंतर व्हायरसचा आलेख खाली येईल. नवीन प्रकार, लोकांची निष्काळजीपणा आणि हवामानातील बदल यामुळे कोविड वाढत आहे. सध्या नवीन प्रकरणे वाढू शकतात, मात्र काही कालावधीनंतर प्रकरणे कमी होतील. आता लोकांसाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे खूप महत्वाचे झाले आहे. निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो.