दिल्ली : कायम कुरापती करणाऱ्या चीनला भारताचा(India) जबरदस्त झटका दिला आहे. तब्बल 726 चीनी नागरीकांचा(Chinese nationals) व्हिसा(VISA) भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs of India)नाकारला आहे. तर, रद्द, 117 चीनी नागरिकांना देशाबाहेर काढले आहे. हे सर्व व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे भारतात राहत होते. भारतात अवैद्यपणे राहणाऱ्या आणि घुसखोरी करणाऱ्यांवर सुरक्षा मंत्रालयाची विशेष नजर आहे. बेकायदीशर पणे वास्तव्यास असेलल्या परदेशी नागरीकांची यादी तयार करण्यात आली. या यादीत चीनी नागरीकांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.
चीनच्या कुरापतींमुळे पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सतत तणाव आहे. मात्र, भारताने चीनला चांगलाच धडा शिकवला आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने भारतात अवैद्यपणे राहणाऱ्या परदेशी नागरीकांची माहिती दिली.
भारताने 2019-21 या तीन वर्षांमध्ये चीनच्या एकूण 726 नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. या सर्वांची एक यादीच सरकारने तयार केली आहे. या यादीत समाविष्ट असलेले लोक भारतात येऊ शकत नाहीत. इतकेच नाहीतर याच काळात भारतातून 117 चिनी लोकांना परत पाठवण्यात आल्याचीही माहितीही देण्यात आली आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. चीनी नागरिकांना व्हिसाच्या अटींचे उल्लंघन आणि इतर बेकायदेशीर पणे वास्तव्यास असल्या प्रकरणी यांना या ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे.
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 81 चिनी नागरिकांनी भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती देखील राय यांनी दिली.
भारतात अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या नागरीकांवर सरकार वॉच ठेवते. यामध्ये चिनी नागरिकांचा देखील समावेश आहे. जे वैध कागदापत्रांसह देशात प्रवेश करतात. नोकरी, पर्यटन किंवा इतर काही कामसाठी हे नागरिक भारतात येतात. यातील बहुतांश नागरिक हे व्हिसा नियमांचे आणि इतर बेकायदेशीर कृत्यांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले. त्यांना आधी नोटीस दिली जाते आणि त्यानंतर त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या इतर लोकांवर सरकार सातत्याने कारवाई करत आहे.