नवी दिल्ली : कोरोना रुग्णवाढीसंदर्भात (Corona Update) महत्त्वाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात कोरोना रुग्णावाढ (India Corona Tally) ही 2 हजार पेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं आहे. तर एकूण 40 कोरोना रुग्णांचा देशभरात गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. सध्या देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 4 कोटी 30 लाख 47 हजार 594 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 5 लाख 22 हजार 006 वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून (Health Ministry) ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या कोरोना रुग्णवाढीच्या आकडेवारीनुसार आता देशातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ही आता बारा हजारच्या पार गेली आहे. देशात सध्या 12,340 इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Single day rise of 2,067 new COVID-19 infections, 40 fatalities push India’s tally of cases to 4,30,47,594, death toll to 5,22,006:Govt
— Press Trust of India (@PTI_News) April 20, 2022
दरम्यान, महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्रानं कोरोनाच्या रुग्णवाढीवर पत्र लिहिलंय. महाराष्ट्रातही अल्प प्रमाणात रुग्णवाढीची तेजी पाहायला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय, की वाढत असलेली कोरोना रुग्णवाढ चिंताजनक नाही. महाराष्ट्रानं हजारोंच्या संख्येनं होणारी रुग्णवाढही पाहली आहे. हाताळलीदेखील आहे. सध्याच्या घडीला वाढत असलेली रुग्णवाढ ही अल्प प्रमाणातही आहे. दरम्यान, रुग्णवाढीवरुन केंद्रानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केलं जाईल, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
दिल्ली एनसीआर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वाढीनं चिंता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. मुंबईतही रुग्णवाढीचं प्रमाण लक्षणीय नसलं, तरीदेखील काळजी घेण्याचं आवाहनही केलं जातंय. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मास्कसक्ती होणार की काय, असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.
गेल्या दोन दिवसांत दिल्ली आणि परिसरात कोरोना रुग्णवाढीनं वेग पकडला आहे. तिप्पट वेगानं रुग्णवाढ होत असल्यानं काळजी घेण्याचं आणि खबरदारी बाळगण्याचं आवाहनही केलं जातंय.
Corona Cases : लहान मुलांना कोरोनाच्या नव्या लाटेचा मोठा धोका, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…