नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. कोरोनाने आता पंतजली योगपीठातही धडक दिली आहे. हरिद्वारमधील पतंजली योगपीठातील 83 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे योगगुरु रामदेव बाबा यांचीही कोरोना चाचणी होण्याची शक्यता आहे. योगपीठात इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आता योगपीठातील अन्य लोकांचीही कोरोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. (83 corona positive at Patanjali Yogpeeth, Ramdev Baba likely to undergo corona test)
पतंजली योगपीठाच्या अनेक संस्थांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. हरिद्वारचे सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये 83 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. या सर्वांना योगपीठाच्या परिसरातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. गरज भासल्यास रामदेव बाबा यांचीही कोरोना चाचणी करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
यापूर्वी ऋषिकेशमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमधील ओपीडी बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ओपीडी काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 200 बेड उपलब्ध आहेत. गरज पडल्यात ही संख्या 500 पर्यंत वाढवण्यात येईल अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान संस्थानकडून देण्यात आलीय.
माकप नेते सीताराम येचुरी यांना पुत्रशोक झाला. आशिष येचुरी यांचे कोरोनावरील उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी निधन झाले. आशिष यांच्यावर गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सीताराम येचुरी यांनी ट्विटरवरुन पुत्रनिधनाची दुःखद बातमी दिली. “मी अत्यंत दुःखाने कळवू इच्छितो, की माझा मोठा मुलगा आशिष येचुरी याचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. आशिषवरील उपचारादरम्यान आमच्या मनात आशेचा किरण जागवणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो. डॉक्टर, नर्स, फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि आमच्या पाठीशी उभे राहिलेले असंख्य जण” असं ट्वीट सीताराम येचुरी यांनी केले आहे.
I bid goodbye to my son, Ashish (Biku) at noon today.
I thank all of you who have shared our sorrow. I thank everybody who gave us strength to be able to face this dark hour. I know that I am not alone in my grief, with this pandemic consuming countless lives.— Sitaram Yechury (@SitaramYechury) April 22, 2021
संबंधित बातम्या :
‘अदर पुनावाला ‘डाकू’, सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घ्या’, भाजप आमदाराने तारे तोडले
83 corona positive at Patanjali Yogpeeth, Ramdev Baba likely to undergo corona test