वाराणसी : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतोय. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं वाढतं प्रमाण यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अशावेळी एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोच्या माध्यमातून फक्त आरोग्य व्यवस्थाच नाही तर प्रशासन आणि समाजाचे धिंडवडे निघत आहेत. या फोटोमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या मुलाचा मृतदेह पाहून एक आई कशी हताश आणि निश्चल बनण्याची वेळ आलीय हे पहायला मिळतंय. (A photo of a mother carrying the body of a son Death by corona)
समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत असलेला हा फोटो उत्तर प्रदेशातील वाराणसीचा असल्याचं सांगितलं जातंय. कोरोनामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी या माऊलीला ना रुग्णवाहिका मिळाली ना कुणाचा आधार. एका रिक्षामध्ये लेकाचा मृतदेह टाकून ती माऊली स्मशानभूमीची वाट धरतेय. रिक्षाच्या एका बाजूला ती माऊली बसलीय. तर तिच्या पायाशी मुलाचा मृतदेह आडवा टाकला आहे. तर दुसऱ्या बाजूला दोन पिशव्या ठेवल्याचं या फोटोमध्ये दिसतंय.
वाराणसी की यह तस्वीर बहुत दुःखद है।
कैसे एक लाचार माँ अपने बेटे के पार्थिव शरीर को भी सम्मान नहीं दे पा रही है !! pic.twitter.com/vgtQugoVHJ— Aadesh Rawal (@AadeshRawal) April 20, 2021
हा फोटो आपल्या यंत्रणेचा, आरोग्य व्यवस्थेचा आणि समाजाच्या मानसिकतेचं खरं रुप दाखवणारा असल्याचं मत अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. तर काहीजण हा फोटो वाराणसीचाच असल्याचं कशावरुन? असा प्रश्नही विचारत आहेत. दरम्यान, हृदय पिळवटून टाकणारा हा फोटो वाराणसीचा असेल किंवा अन्य कुठला, पण हा फोटो मन सुन्न करणारा आहे.
जेव्हा 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना लस दिली जाणार आहे, तेव्हा आताच आपल्याला संपूर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा समजून घेणे आवश्यक आहे. बर्याच राज्यांतून लसीचा तुटवडा असल्याचे वृत्त आल्यानंतर सरकारने पुरेसा साठा करण्याचे आश्वासन दिले. गरज आणि मागणीनुसार ही लस दिली जाते. आपल्याला देखील कोरोना लस घ्यायची असल्यास कशी नोंदणी करावी हे जाणून घ्या.
नोंदणी प्रक्रिया खूप सोपी आहे. आपल्या मोबाईल फोनवर किंवा संगणक ब्राऊझरवर https://selfregifications.cowin.gov.in/ वर लॉगिन करा. येथे आपल्याला आपल्या मोबाईल नंबरसह नोंदणी करावी लागेल. आपण पोर्टलद्वारे निर्धारित वेळ मर्यादेत लसीसाठी नोंदणी करण्यास सक्षम असाल. सुमारे चार लोक मोबाईल फोनवरून लसीसाठी नोंदणी करू शकतात.
संबंधित बातम्या :
आग ओकणाऱ्या उन्हात गरोदर महिला DSP कोरोना ड्युटीवर उभी, दीड शहाणे मात्र थोबाड वर करुन भटकंतीला
प्लाझ्मा दान करण्यासाठी ‘त्या’ मुस्लिम तरुणाने रोजा सोडला; दोन महिलांचा जीव वाचला
A photo of a mother carrying the body of a son Death by corona