मुंबई : संपूर्ण देशात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. ही रुग्णवाढ पाहता देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं स्पष्ट होत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च टीमने तयार केलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहेत. कोरोनाची दुसरी लाट जवळपास 100 दिवस भारतात राहील. त्यामुळे 15 फेब्रुवारी ही तारीख गृहित धरली तर मे पर्यंत या लाटेचा परिणाम पाहायला मिळू शकते. या अहवालानुसार एप्रिल- मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट जोरदार असणार आहे.(The second wave of corona will be in the peak in April and May, SBI reports)
23 मार्चच्या कोरोना ट्रेन्डचा विचार करायचा झाला तर, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 25 लाखापेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त होऊ शकतात. SBIकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या 28 पानी अहवालानुसार, लोकल स्तरावर लॉकडाऊनसारख्या निर्बंधांचा कुठलाही परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे लसीकरणावर भर आणि त्याचा वेग वाढवणं गरजेचं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
आर्थिक बाबींचा विचार करायचा झाला तर गेल्या आठवड्यापासूनच इंडेक्समध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. काही राज्यात कडक लॉकडाऊनच्या निर्णयाचे परिणाम पुढील महिन्यात दिसून येतील, असं अहवालात नमूद करण्यात आलंय. तसंच अहवालात राज्यांनी लसीकरणावर भर देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.
सध्या रोज 34 लाख लोकांना लस दिली जात आहे. हा वेग 40 ते 45 लाखांवर घेऊन गेल्यास पुढील 3 ते 4 महिन्यात 45 वर्षांवरील सर्वांना लस टोचली जाऊ शकते. कोरोनाची दुसरी लाट वेळेपूर्वी आल्याचं ICMRचे डायरेक्टर जनरल बलराम भार्गव यांनी सांगितलंय. त्यामुळे आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. टेस्टची संख्या वाढवणे, मास्क वापरणे, सोबतच लसीकरण मोहीम लवकर पूर्ण करण्याची गरज ICMRकडून व्यक्त करण्यात आली आहे.
पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसह अधिक वृद्धांची संख्या असलेल्या राज्यांनी आपल्या लोकसंख्येच्या कमी प्रमाणात लसीकरण केलं आहे. लसीकरणाची गती वाढवणं गरजेचं असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.
R Madhavan | आमीर खाननंतर आर. माधवनलाही कोरोनाची लागण, ‘ऑल इज वेल’ म्हणत शेअर केली पोस्ट!@ActorMadhavan | #rmadhavan | #coronavirus | #Bollywood https://t.co/M6QreRAcXl
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021
संबंधित बातम्या :
देशात पुन्हा लॉकडाउन होणार का? RBI गव्हर्नर यांनी दिली महत्त्वाची माहिती
The second wave of corona will be in the peak in April and May, SBI reports