नवी दिल्ली – एका दिवसात 2,380 नवीन कोरोना (Corona) रूग्णांची नोंद झाली आहे, भारतातील (India) कोरोनाच्या प्रकरणांची एकूण संख्या 4,30,49,974 वर पोहोचली आहे. तर सध्या देशातल्या सक्रिय प्रकरणांची संख्या 13,433 वर पोहोचली आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) नुकतीच जाहीर केली आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची अनेकांनी शक्यता व्यक्त केली आहे.
India reports 2,380 new COVID19 cases today; Active caseload at 13,433 pic.twitter.com/azHYnOp9hq
— ANI (@ANI) April 21, 2022
56 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 5,22,062 वर पोहोचला आहे. सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आकडेवारीनुसार, एकूण कोरोनाबाधित झालेल्या लोकांपैकी 0.03 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर 98.76 टक्के राहिला आहे, असे मंत्रालयाने जाहीर केले आहे. 24 तासांच्या कालावधीत सक्रिय कोरोना नवीन 1,093 रूग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
भारतातील कोरोनाची संख्या 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबर रोजी 40 लाख आणि 16 सप्टेंबर रोजी 50 लाखांवर गेली होती. 28 सप्टेंबर रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर रोजी 70 लाखांवर गेली होती. तर 29 ऑक्टोबर रोजी 80 लाख, 20 नोव्हेंबर रोजी 90 लाख आणि 19 डिसेंबर रोजी एक कोटींचा टप्पा ओलांडला होता. देशाने 4 मे रोजी दोन कोटी आणि गेल्या वर्षी 23 जून रोजी तीन कोटींचा टप्पा पार केला.