नवी दिल्ली : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट (Corona Cases in India) होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. (India reports record break 414188 new COVID19 cases in the last 24 hours)
24 तासातील आकडेवारी
सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास दोन हजारांनी वाढ झाली आहे. तर 3 हजार 915 रुग्णांना प्राण गमवावे लागले. आधीच्या दिवशी भारतात एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींची ( 3 हजार 980) नोंद झाली होती. आजचा आकडा कमी असला, तरी त्याच्या जवळ जाणारा आहे. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 31 हजार 507 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ही संख्याही आदल्या दिवसापेक्षा अधिक आहे.
आतापर्यंतची आकडेवारी
आतापर्यंत देशात 1 कोटी 76 लाख 12 हजार 351 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 14 लाख 91 हजार 598 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 34 हजार 83 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 36 लाख 45 हजार 164 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 16 कोटी 49 लाख 73 हजार 164 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 4,14,188
देशात 24 तासात मृत्यू – 3,915
देशात 24 तासात डिस्चार्ज -3,31,507
एकूण रुग्ण – 2,14,91,598
एकूण मृत्यू – 2,34,083
एकूण डिस्चार्ज – 1,76,12,351
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 36,45,164
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 16,49,73,058
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती (India COVID19 cases 24 hours)
India reports 4,14,188 new #COVID19 cases, 3,31,507 discharges, and 3,915 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,14,91,598
Total recoveries: 1,76,12,351
Death toll: 2,34,083
Active cases: 36,45,164Total vaccination: 16,49,73,058 pic.twitter.com/8sLmOnQqjz
— ANI (@ANI) May 7, 2021
संबंधित बातम्या :
मुंबईत प्रत्येक विभागात ड्राईव्ह इन लसीकरण होणार, तुमच्या जवळचे केंद्र बघा
खरंच प्लाझ्मा डोनेशनमुळे कोविड बरा होतो का? जाणून घ्या प्लाझ्मा कधी आणि कसे करु शकतो दान
(India reports record break 414188 new COVID19 cases in the last 24 hours)