मुंबई : कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधत देशभरात वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही वीर जवानांच्या आठवणींना उजाला दिला आणि त्यांना नमन केलं. यावेळी त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते. “1999 मध्ये कारगिल युद्धात देशाच्या सैनिकांनी वीरतेचं प्रदर्शन केलं, शौर्य दाखवलं. हा इतिहास कायम सुवर्ण अक्षरात अधोरेखित असेल. मी त्या वीर जवानांना सलाम करतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो. “, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आणि पाकव्याप्त काश्मीरबाबत भाष्य केलं. गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा पार करू शकतो असंही त्यांनी सांगितलं.
कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, “त्या वेळेस आम्ही नियंत्रण रेषा पार केली नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही एलओसी पार करू शकत नव्हतो. आम्ही एलओसी पार करू शकत होतो, पार करू शकतो आणि भविष्यात गरज पडली तर एलओसी पार करणार. मी देशातील नागरिकांना याबाबत विश्वास देऊ इच्छितो.”
“सध्या युद्धाचा कालावधी लांबत आहे. त्यामुळे भविष्यात देशातील नागरिकांना थेट युद्धात सहभागी होण्यासाठी सज्ज झालं पाहीजे. जनतेनं मानसिकरित्या यासाठी सक्षम होणं गरजेचं आहे. देशाला याची गरज असून सैनिकांच्या मदतीसाठी सज्ज राहणं आवश्यक आहे.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
"India will cross Line of Control if….": Rajnath Singh warns Pakistan on Kargil Diwas
Read @ANI Story | https://t.co/u9dL0k95OL#RajnathSingh #KargilWarDivas #Pakistan pic.twitter.com/QDMNLWlu0v
— ANI Digital (@ani_digital) July 26, 2023
‘कारगिल युद्ध भारतावर लादलं गेलं होतं. भारत पाकिस्तानसोबत चर्चेनं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्यांनी पाठीत खंजीर खुपसलं. ऑपरेशन विजयच्या दरम्यान भारतीय सेनेने फक्त पाकिस्तानलाच नाही तर जगाला संदेश दिला. जेव्हा आमच्या देशहिताची बाब समोर येईल तेव्हा आमची सेना मागे हटणार नाही.’