पीएम केअर फंडात जवानांनी किती पैसे दिले ? वाचा हा रिपोर्ट

| Updated on: Dec 19, 2020 | 3:59 PM

पीएम केअर फंडमधील दानयज्ञात भारताचे जवानही मागे नसल्याचे समोर आले आहे. (armed force pm cares)

पीएम केअर फंडात जवानांनी किती पैसे दिले ? वाचा हा रिपोर्ट
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister Narendra Modi) यांच्या आवाहनानंतर देशातील सामान्य नागरिकापासून ते बड्या उद्योगपतींनी पीएम केअर फंडमध्ये (PM-CARES FUND) खुल्या हाताने दान दिले. मात्र, या दानयज्ञात भारताचे जवानही मागे नसल्याचे समोर आले आहे. कोरोनाविरोधातील लढ्यासाठी देशातील सैनिकांनी पीएम केअर फंडमध्ये तब्बल 200 कोटी रुपये दान केले आहेत. ही माहिती एका माहिती अधिकाराखाली मिळाली आहे. (indian armed forces donated five thousand in pm cares fund)

वायूदल, नैदलाकडून मोठी मदत

देशात कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेले. अजूनही कोरोना संसर्गावर पुरेसे नियंत्रण मिळवता आलेले नाही. देशात कोरोना संसर्ग वाढलेला असताना आरोग्य सुविधा उभारण्याठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडात मदत करण्याचे आवाहन केले. नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला नागरिक, उद्योगपती, बँक अधिकारी, मोठ्या कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या सर्वांनी कोरोनाशी दोन होत करण्यासाठी कोटींनी दान केले.

या दानयज्ञात देशाच्या शत्रूंशी दोन करणाऱे भारतीय जवानही मागे राहिले नाहीत. त्यांनी आतापर्यंत 200 कोटींपेक्षांही जास्त रुपये पीएम केअर फंडमध्ये जामा केले आहेत. एप्रील ते ऑक्टोबर या महिन्यांत भारतीय वायूदलाचे जवान तसेच अधिकाऱ्यांनी पीएम केअर्स फंडमध्ये 29.18 रुपयांची मदत केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय नौदलातील सैनिक तसेच अधिकाऱ्यांनी मिळून एकूण 12.41 कोटी रुपये दान दिले आहेत. मात्र, भूदलाने (आर्मी) याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे.

आर्मीने केले 157 कोटींची मदत

इंडयन आर्मीचे एडीजी पीआय यांनी मदतीसंदर्भात 15 मे रोजी एक ट्वीट केले होते. त्यावेळी त्यांनी पीएम केअर फंडमध्ये दिलेल्या मदतीबाबत माहिती दिली होती. ‘भारतीय जवानांनी एप्रिल 2020 महिन्यातील एका दिवसाचे वेतन पीएम केअर फंडमध्ये जमा केले आहे. हे वेतन त्यांनी स्वतहून दिले आहे. ही मदत एकूण 157.71 कोटी एवढी आहे. ही सर्व मदत कोरोनाविरोधात लढाई करण्यासाठी पीएम केअर फंडमध्ये जमा केली आहे,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
दरम्यान, तिन्ही दलांचे जवान आणि अधिकारी यांनी एकूण 203.67 कोटी रुपये जमा केले आहेत. तसेच, भारतीय संरक्षण दल, संरक्षण मंत्रालय तसेच इतर संरक्षणविषयक उपक्रमांतर्गत एकूण 500 कोटी रुपये पीएम केअर फंडमध्ये जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पीएम केअर्स फंडवर बड्या नेत्यांची टीका

 

दरम्यान, पीए केअर्स फंडावरुन मोदी सरकारवर मोठी टीका होत आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांच्यापासून ते काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी या बड्या नेत्यांनी फंडमध्ये जमा होत असलेल्या निधीवर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. कोरोना काळात जमा झालेल्या पैशांचं काय झालं?, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केलेला आहे. त्यांनतर आता तिन्ही संरक्षण दलांकडून तब्बल 200 कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याचे समोर आले आहे.

संबंधित बातम्या :

काँग्रेसच्या अध्यक्षपदी जवळपास राहुल गांधीच निश्चित; सोनियांच्या बैठकीतून मोठा निर्णय?

Reservation: आरक्षणाचा अर्थ मेरिट नाकारणं असा नव्हे; सुप्रीम कोर्टाचं मोठं भाष्य

ममतांच्या आमदारांची फोडाफोडी, मराठी नेत्यांवर विशेष जबाबदारी, भाजपचं ‘मिशन बंगाल’ नेमकं काय?

(indian armed forces donated five thousand in pm cares fund)