लडाख : गेल्या चार वर्षांत भारत आणि चीनमधून विस्तव जात नसताना भारतीय सैन्याच्या रणगाडे आणि उखळी तोफांनी इंदू नदी ओलांडत चीनला कडक इशारा दिला आहे. पूर्व लडाख सीमावादात कधीही शस्राचा वापर किंवा सामर्थ्य वापरायचे नाही या वचनाला भारत आतापर्यंत जागला आहे. परंतू भारताने प्रथमच लडाखमध्ये उखळी तोफा आणि रणगाडे आणून ठेवले आहेत.
भारतीय सैन्याच्या 14,500 फूटांवरील नयोमा मिलिटरी मिलिटरी स्टेशनवर एएनआय या वृत्तसंस्थेच्या टीमने भेट दिली. त्यावेळी नवीन शस्रास्रे आणि रणगाडे तसेच उखळी तोफांची जंत्रीच येथे तैनात असलेली दिसल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. त्यामुळे भारतीय सैन्याने येथे आपली कोणत्याही संभाव्य आगळीकीशी तोंड देण्यासाठी सुसज्ज उपस्थिती दाखविली आहे.
ANI चे ट्वीट पाहा
Indian Army adds new weapons, equipment in Eastern Ladakh for operations in region
Read @ANI Story| https://t.co/GmLeLrKQKU#IndianArmy #Ladakh #Leh pic.twitter.com/mN4f0P4CO5
— ANI Digital (@ani_digital) July 8, 2023
इर्स्टव्हाईल ओर्डनन्स फॅक्टरी बोर्डाने देशांतर्गत विकसित लडाख सेक्टरमध्ये तैनात केल्या आहेत. साल 2020 गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर ही सैन्य सज्जता करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने विकसित केलेली सर्व्हेलन्स सिस्टीम टाटा रजक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तिच्यामुळे 15 किमीपर्यंत मानवी हालचाल तसेच 25 किमीपर्यंत व्हेईकलची तैनाती करण्यात आली आहे.
देशांतर्गत तयार करण्यात आलेली धनुष या होवित्झर तोफा देखील तैनात केल्या गेल्या आहेत. बोफोर्स होवित्झर्स खरेदी करताना केलेल्या तंत्रज्ञान स्थानांतर करारांर्तगत या तोफा देशात तयार केल्या आहेत. त्यामुळे त्याअधिक आधुनिक झाल्या आहेत. धनुष होवित्झर्स तोफा या 48 किमीपर्यंत मारा करण्याच्या क्षमतेच्या असल्याचे आर्टलरीचे रेजीमेंट कॅप्टन व्ही. मिश्रा यांनी म्हटले आहे. या तोफांमुळे पूर्व लडाख सेक्टरमध्ये भारतीय सैन्याची मारक क्षमता वाढली आहे. 10 कोम्बॅट व्हेईकल तैनात करण्यात आल्या आहेत. या कल्याणी एम 4 नावाच्या या चिलखती गाड्या लाईन ऑफ कंट्रोलवर तैनात केल्या आहेत. त्यांचा वेग ताशी 60-80 किमी इतका आहे.
आर्मीने विकसित केलेली आणि इर्स्टन लडाख सेक्टरमध्ये गेली काही वर्षे यशस्वी चाचणी घेतलेली K-9 वज्र सेल्फ प्रोपेल्ड आर्टीलरी गन देखील तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. एल एण्ड टी ग्रुपने त्यांच्या हजारा प्लांटमधून तयार केलेल्या अशा शंभरहून अधिक गन लडाखमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. याद्वारे शत्रूच्या टॅंक आणि आर्मर फायटिंग व्हेईकलना टॅकल करणे सोपे होणार आहे. सैन्याला भविष्यात मेक इन इंडीया थर्ड जनरेशन मिसाईल देखील मिळणार आहेत.