लष्करातला सैनिक पाकिस्तानी गुप्तहेरला माहिती देताना सापडला, ही कारवाई होणारच…

| Updated on: Feb 18, 2023 | 7:15 PM

भारतीय सैन्यदलातील सैनिकाकडून जी माहिती देण्यात आली आहे. ती माहिती ही कोविड काळातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या हालचालींची यादी तसेच फॉर्मेशनच्या वाहनांशी संबंधित माहिती दिली होती.

लष्करातला सैनिक पाकिस्तानी गुप्तहेरला माहिती देताना सापडला, ही कारवाई होणारच...
Follow us on

नवी दिल्लीः भारतीय सैन्य दलातील एका सैनिकाकडून संरक्षण दलातील महत्वाची माहिती पाकिस्तान दूतावासातील आयएसआय एजंटला माहिती देताना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात आता कोर्ट मार्शलची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. भारतीय सैन्य दलात असलेला आरोपी अलीम खान चीनच्या हद्दीवर तैनात होता. त्याने नवी दिल्लीतील दूतावासात तैनात असलेल्या एका पाकिस्तानी एजंटला अत्यंत गोपनीय माहिती देत असल्याच्या आरोपाखाली त्याला आता ताब्यात घेण्यात आले आहे.

येत्या काही दिवसांत संबंधित सैनिकाविरोधात कोर्ट-मार्शलची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.हो हा सैनिक पाकिस्तानी गुप्तहेर आबिद हुसेन उर्फ ​​नाईक आबिदला सुरक्षा यंत्रणांना गुप्त माहिती देत ​​असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

YouTube video player

तर या प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आले असून तो आता पकडला गेला आहे. भारतीय लष्करात काम करणाऱ्या एका जवानालाही त्याने १५ हजार रुपये दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

एका वृत्तसंस्थेच्या माहिती दिली आहे की, भारतीय लष्करातील या जवानांच्या या हालचालीही चीनकडून ज्यावेळी उत्तरेकडील सीमेवरुन आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

त्याचवेळी सैन्य दलातील माहितीची देवाण घेवाण झाल्याचे तपासात म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय सैन्यदलातील सैनिकाकडून जी माहिती देण्यात आली आहे. ती माहिती ही कोविड काळातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या हालचालींची यादी तसेच फॉर्मेशनच्या वाहनांशी संबंधित माहिती दिली होती.

चीनच्या सीमेवर उपग्रहाचे निरीक्षण करणार्‍या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचीही माहिती देण्याचा प्रयत्न सैनिक करत होता. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला होता.