भारताने पाणबुडीतून डागले अण्वस्र क्षमतेचे बॅलेस्टीक मिसाईल, का केली गुप्त चाचणी पाहा

| Updated on: Nov 28, 2024 | 12:27 PM

भारतीय नौदल आणि डीआरडीओने समुद्रात सिक्रेट मिसाईट टेस्ट केली आहे. पाणबुडीवरुन डागता येणाऱ्या अण्वस्रवाहू बॅलेस्टिक मिसाईल K-4 ची यशस्वी चाचणी करण्यात भारताला यश आले आहे.

भारताने पाणबुडीतून डागले अण्वस्र क्षमतेचे बॅलेस्टीक मिसाईल, का केली गुप्त चाचणी पाहा
Submarine-Launched Ballistic Missile
Follow us on

भारतीय नौदलाने न्युक्लीअर पॉवर पाणबुडी ‘अरिघात’ वरुन प्रथमच अण्वस्र क्षमतेचे बॅलेस्टीक मिसाईल ( K-4 SLBM ) यशस्वी चाचणी केली आहे.या अण्वस्रवाहू बॅलेस्टीक मिसाईलची रेंजर 3,500 किमी आहे. या मिसाईलची खास बाब म्हणजे ही देशाला सेंकड स्ट्राईकची क्षमता देते. म्हणजे देशाच्या न्युक्लीअर हल्ल्याला ताकद देणारी ही मिसाईल आहे.जर जमीनीवरुन हल्ला करण्यासारखी परिस्थिती नसेल तर पाण्याच्या शत्रू देशावर अण्वस्र हल्ला करण्याची या मिसाईलची क्षमता आहे.

K-4 SLBM ही मिसाईल इंटरमिडीयट रेंजची सबमरीनवरुन लॉंच होणारी अण्वस्र वाहू बॅलेस्टीक मिसाईल आहे. या मिसाईलला नौदलाच्या अरिहंत क्लासच्या पाणबुड्यांना हे मिसाईल लावले आहे.यापूर्वी भारतीय नौदल के-15 चा वापर करीत होती. परंतू के-4 slbm त्याहून चांगल्या अधिक अचूक, चांगली, मॅन्युवरेबल आणि सहजपणे ऑपरेट होणारी मिसाईल आहे.

आयएनएस एरिहंत आणि अरिघात पाणबुड्यात चार व्हर्टिकल लॉंचिंक सिस्टीम आहेत. ज्यातून हे मिसाईल लॉंच होते. या मिसाईट 17 टन वजनाचे असून त्याची लांबी 39 फूट आहे. त्याचा व्यास 4.3 मीटर आहे. यात 2500 किलोग्रॅम वजनाचे अण्वस्र वाहून शत्रूवर अचूक हल्ला करता येतो.

हे सुद्धा वाचा

चार हजार किमीचा पल्ला

दोन टप्प्याच्या या मिसाईल सॉलिड रॉकेट मोटरवर चालते. यात प्रोपेलेंट देखील सॉलीड आहे. या मिसाईलची ऑपरेशनल रेंज चार हजार किमी आहे. भारत कोणावरही प्रथम अणूहल्ला करणार नाही असे भारताचे तत्व आहे. परंतू भारतावर कोणी हल्ला केला तर भारत त्यांना सोडणार नाही. त्यामुळे सेंकड अटॅकसाठी असे मिसाईल भारताकडे असणे गरजेचे होते.

यापूर्वी देखील झाल्या चाचण्या

15 जानेवारी 2010 रोजी विशाखापट्टनम किनाऱ्यावर देखील पाण्याच्या 160 फूट आत पॉन्टून तयार करुन तेथून या मिसाईलची डेव्हलपमेंट लॉंच झाले होते.त्यानंतर त्याच जागी 24 मार्च 2024 रोजी तेच तंत्र वापरुन या मिसाईलची पहिली यशस्वी चाचणी झाली होती. त्यानंतर 7 मार्च 2016 रोजी या दुसरी यशस्वी चाचणी झाली. साल 2016 मध्ये आयएनएस अरिहंत वरुन 700 km रेंजच्या मिसाईलची चाचणी झाली होती.