नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या (Corona Virus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. भारतीय रेल्वेनेही प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रवाशांनी त्याचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करण्यास सांगितलं आहे. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (Indian Railway warns passengers must follow corona guidelines before travel in trains)
रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. विशेषतः राज्यांनी जारी केलेल्या कोरोना विषयक गाईडलाईन्सचं पालन करणंही महत्त्वाचे आहे, असं रेल्वेकडून सांगण्यात आलंय. रेल्वेकडून सातत्याने ट्विट करुन प्रवाशांना याबाबत माहिती दिली जात आहे.
प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी विविध राज्यांनी दिलेल्या आरोग्यविषयक गाईडलाईन्स वाचाव्यात, असे ट्विट करुन रेल्वे मंत्रालयाने केले आहे. ट्विटमध्ये रेल्वेनं प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी राज्यांचे दिशानिर्देश वाचले पाहिजेत, असं सांगितले आहे. प्रवासी ज्या राज्यांमधून प्रवास करणार आहेत त्या राज्यांच्या गाईडलाईन्स वाचाव्यात, असं रेल्वेने सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत त्यामुळे कोरोनाविषयक नियम कडक करण्यात आळे आहेत. रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांनी त्या नियमांविषयी जागरुक राहावे आणि पालन करावे, असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलंय. काही राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारकर करण्यात आला आहे. प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट दाखवणं आवश्यक आहे. राज्यस्थान सरकारनं इतर राज्यांमधून येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक केलं आहे.
भारतीय रेल्वेच्या पूर्व मध्य रेल्वे, ईशान्य रेल्वे, पश्चिम रेल्वेसह अनेक झोनमध्ये गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. थर्मल स्कॅनिंग, रेल्वे स्थानकांवर मास्क घालणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. बिहारनं महाराष्ट्र, पंजाब आणि केरळ येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक केलं आहे.
“लॉकडाऊनचा निर्णय लोकांच्या हातात, परिस्थिती अशीच राहिली तर रात्रीचे नियम सकाळी लावावे लागतीत” https://t.co/rxP8cZBdNh#coronavirus | #Corona | #CoronaVirusUpdates | #lockdown |
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
संबंधित बातम्या:
‘मिशन लसीकरण’; राज्यात कोरोना लसीकरणाच्या कामाला वेग; चांद्यापासून बांद्यापर्यंत जय्यत तयारी!
रात्री 8 वाजता यायचं, काहीही बोलायचं आणि निघून जायचं, असं काम आम्ही करत नाही : अस्लम शेख
(Indian Railway warns passengers must follow corona guidelines before travel in trains)