नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. ऑनलाईन ट्रेनचे तिकीट बुकींग करणे आता आणखी सोपे होणार आहे. लवकरच भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट IRCTC नव्या लूकमध्ये दिसणार आहे. यात विविध फिचर्स अपडेट करण्यात येणार आहे. यामुळे ऑनलाईन तिकीट बुकींग करणे आता सोपे होणार आहे. (Indian Railways Upgrade IRCTC E-Ticketing Website)
मिळालेल्या माहितीनुसार, IRCTC च्या वेबसाईटद्वारे आता एका मिनिटात 7500 तिकीट बुक करता येतात. मात्र नव्या वेबसाईटनुसार आता एका मिनिटाला 10 हजार तिकीट बुक करता येणार आहे. म्हणजे व्यस्त मार्गांवरही सहज तिकीटे उपलब्ध होणार आहेत.
रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी यंदा वर्षात 31 डिसेंबरला नवीन वेबसाईटचे लोकापर्ण करणार आहे. गुरुवारी दुपारी 12 पर्यंत रेल्वेमंत्री IRCTC नवी वेबसाईट लाँच करणार आहेत. सध्याच्या वेबसाईटपेक्षा नवीन वेबसाईटमध्ये तिकीट बुकींगसाठी अनेक फ्रेंडली फिचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवासी सहजरित्या तिकीट बुकींग करता येणार आहे.
प्रवाशांना ऑनलाईन तिकीटाची सुविधा देण्यात येणाऱ्या IRCTC चे ई-तिकिटींग वेबसाईटसोबत अॅपही अपडेट होणार आहे. या अॅपमध्येही वेबसाईटप्रमाणे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच नव्या वेबसाईटमध्ये पहिल्यापेक्षा अधिक जाहिरातीही देण्यात येणार आहेत. यामागे अधिक महसूल मिळविणे हे उद्दीष्ट आहे.
IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, आता दर मिनिटाला जास्त तिकीट बुक करता येणार असल्याने लाखो रेल्वे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा बिहारमधील सहरसा, भागलपूर यासारख्या शहरातील प्रवाशांना होणार आहे. (Indian Railways Upgrade IRCTC E-Ticketing Website)
संबंधित बातम्या :
Bank Holidays in January 2021 | जानेवारीचा अर्धा महिना सुट्ट्यांचा, 14 दिवस बँका बंद!
छोट्या शहरातील लोक का खरेदी करतायत सोनं? 7 कोटींहून अधिक सोन्याची खरेदी