एकीकडे वंदेभारत ही भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन यशस्वीपणे धावत असताना.आता भारतीय रेल्वेने दर ताशी 250 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनचे सेट डिझाईन, मॅन्युफॅक्चरींगसाठी निविदा काढली आहे. आता भारतीय रेल्वे तिच्या पेक्षाही वेगाने धावणारी ट्रेन बनविण्याच्या विचारात आहे. भारतीय रेल्वेने या वर्षांच्या सुरुवातीलाच जुन महिन्यात चेन्नईतील आयसीएफ कोच फॅक्टरीला पत्र लिहून दोन स्टॅंडर्ड गेजच्या आठ डब्यांच्या ट्रेन बनविण्याची ऑर्डर दिली होती. या पत्रात हा ट्रेन सेट स्टीलपासून तयार करण्यात यावा आणि त्याची वेगमर्यादा कमाल प्रतितास 250 किमी असावी अशी मागणी केली होती.
सध्या वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल वेग दर ताशी 160 किमी असून त्याला शताब्दीच्या दर्जाच्या सुविधा आहेत. परंतू त्याहून अधिक वेगाची ट्रेन बनविण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या संपूर्ण स्वरुप बदलणार आहे. नुकतेच वंदेभारत स्लीपर कोच ट्रेन सेटचे बीईएमएल कंपनीच्या बंगलोर येथील रेल कॉम्प्लेक्स येथील रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अनावरण केले आहे. या वंदेभारत ट्रेन एक्सप्रेसमध्ये वर्ल्ड क्लास फिचर्स आहेत.
इंटेग्रेटेड रिडींग लाईट्स विथ युएसबी चार्जिंगची सुविधा, पब्लिक अनाऊन्समेंट आणि व्युजवल इन्फॉर्मेशन सिस्टीम, इन्साईड डिस्प्ले पॅनल एण्ड सिक्युरिटी कॅमेरा, मॉड्यूलर पॅण्ट्रीस आणि स्पेशल बर्थ, दिव्यांग प्रवाशांसाठी टॉयलेट, तसेच फर्स्ट एसी कारमध्ये शॉवर विथ हॉट वॉटर अशा प्रवाशांना सुविधा मिळणार आहेत. फ्रंट नोझ कोनपासून ते इंटेरिअल पॅनल्स, सिट, स्लीपर बर्थ आणि इतर सुविधा या ट्रेनमध्ये आहेत.