नवी दिल्ली : युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर (Russia Ukraine War) अनेक भारतीय नागरिक मायदेशी निघाले आहेत. गोळीबारात कर्नाटकाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian Student) झाल्याची घटना ताजी असतानाच युक्रेनमधील कीव शहरातून हृदयाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. युक्रेनहून मातृभूमीकडे निघालेल्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याचं वृत्त आहे. संबंधित विद्यार्थी गोळीबारात जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी अर्ध्या वाटेतून परत नेण्यात आले, अशी माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही के सिंग (VK Singh) यांनी दिली. ते सध्या पोलंडमध्ये आहेत. आम्ही कमीत कमी नुकसानासह जास्तीत जास्त नागरिकांचं स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही ते म्हणाले.
I received info today that a student coming from Kyiv got shot and was taken back midway. We’re trying for maximum evacuation in minimum loss: MoS Civil Aviation Gen (Retd) VK Singh, in Poland#RussiaUkraine pic.twitter.com/cggVEsqfEj
— ANI (@ANI) March 4, 2022
युक्रेन आणि शेजारील देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने आपल्या 4 केंद्रीय मंत्र्यांना पाठवले आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही के सिंग यांचा समावेश आहे. मिशन गंगा चालवण्याच्या जबाबदारीसाठी व्हीके सिंग यांना पोलंडला पाठवण्यात आले आहे. यापूर्वी व्हीके सिंग यांनी पोलंडमधील गुरुद्वारा सिंग साहिब येथे राहणाऱ्या 80 भारतीय विद्यार्थ्यांचीही भेट घेतली.
युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धात यापूर्वीच दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 1 मार्च रोजी रशियाने युक्रेनमधील खारकीव्ह येथे हवाई हल्ला केला. यामध्ये कर्नाटकातील नवीन शेखरप्पा नावाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्याचा मृतदेह भारतात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते.
दोन मार्चलाही युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या झाली होती. मृत चंदन जिंदाल हा पंजाबचा रहिवासी असून 4 वर्षांपूर्वी युक्रेनला तो मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता. दोन फेब्रुवारी रोजी त्याची तब्येत अचानक बिघडली. यानंतर त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने चंदनचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे म्हटले होते. युक्रेनमधील भारतीय दूतावास भारतीय नागरिकांसाठी सूचना जारी करत आहे. दूतावासाने याआधी कीव आणि खारकीव सोडून कोणत्याही परिस्थितीत इतरत्र पोहोचण्याचे आवाहन केले होते.
संबंधित बातम्या :
रशियाच्या सैनिकांकडून युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर गोळीबार