नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील पहिल्या तर देशाच्या अकराव्या आलिशान सेमी हायस्पीड वंदेभारतचे भोपाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत आहे. या वर्षअखेर मध्यप्रदेशात विधान सभेच्या निवडणूका लागणार आहेत. देशातील पहिल्या वंदेभारतचे 15 फेब्रुवारी 2019 मध्ये दिल्ली ते वाराणसी मार्गावर पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. पहिल्या टप्प्यात 75 वंदेभारत चालविण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली होती. सध्या देशातील एकूण 15 मार्गांची निवड झाली आहे. ते मार्ग कोणते ते पाहूयात….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक एप्रिल रोजी भोपाळ दौऱ्यावर वंदेभारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ते वंदेभारतचे उद्घाटन करतील. राणी कमलापती रेल्वे स्थानक ( भोपाळ ) ते नवी दिल्ली ही देशातील 11 वी वंदेभारत ठरली आहे. वंदेभारत ही दर ताशी 180 किमी वेगाने धावणारी सेमी हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनची निर्मिती चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात करण्यात आली आहे.
देशातील 12 वी वंदेभारत येथे धावणार
देशातील 12 वी वंदेभारत चेन्नई ते कोईमतूर या मार्गावर धावणार आहे. चेन्नई ते कोईमतूर हे 495.28 किमीचे अंतर ही ट्रेन सहा तास दहा मिनिटात कापणार आहे. दक्षिण भारतातील ही दुसरी आणि देशातील बारावी वंदेभारत ठरणार आहे. येत्या 8 एप्रिल रोजी या बाराव्या वंदेभारत ट्रेनचे उद्घाटन होणार आहे. बुधवार वगळता आठवड्याचे सर्व दिवस धावणार आहे.
उर्वरित वंदेभारतचे मार्ग कोणते
वंदेभारतचे देशातील आतापर्यंत एकूण पंधरा मार्ग निश्तित केले आहे. 11 वी वंदेभारत भोपाळच्या राणी कमलापती स्थानक ते नवी दिल्ली मार्गावर चालविण्यात येत आहे. त्यानंतर 12 वी वंदेभारत चेन्नई ते कोईमतूर या मार्गावर चालविण्याची योजना आहे. त्यानंतर 13 व्या वंदेभारतची राजस्थानच्या जयपूर मार्गावर ट्रायल करण्यात येत आहे. त्यानंतर 14 वी वंदेभारत तिरूपती ते सिंकदराबाद चालविण्याची योजना आहे. तर 15 व्या वंदेभारतचा कार्यक्रम नीटसा कळलेला नाही.
वंदेभारतचे दहा मार्ग खालीलप्रमाणे
1 – नवी दिल्ली ते वाराणसी
2 – नवी दिल्ली ते वेष्णोदेवी माता कटरा
3 – गांधीनगर कॅपिटल ते मुंबई सेंट्रल
4 – Amb Andaura ते नवी दिल्ली
5 – म्हैसूर ते चेन्नई सेंट्रल
6 – नागपूर ते बिलासपूर झारखंड
7 – हावडा ते न्यू जलपैगुरी
8 – सिंकदराबाद ते विशाखापट्टणम
9 – सीएसएमटी ते सोलापूर
10 – सीएसएमटी ते साईनगर शिर्डी