नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेली वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठे बदल होत आहे. त्यातीलच एक अपडेट समोर आली आहे. सध्या देशात दोन डझन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. या रेल्वेत आरामदायक खुर्ची आणि इतर अनेक सुविधा आहेत. वाढता प्रतिसाद पाहून रेल्वेने स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस (Sleeper Vande Bharat Express) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्लीपर वंदे भारत ट्रेन तयार करण्यात येत आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत (ICF) युद्धपातळीवर तिचे काम सुरु आहे. यामध्ये इतर देशांप्रमाणेच आधुनिक सोयी-सुविध आणि इतर फीचर देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठीचे डिझाईन आणि आरामदायक कुशन यांची तयारी पूर्ण झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर कोच कधी धावेल याची माहिती समोर आली आहे.
या महिन्यात धावणार वंदे भारत
चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीचे जनरल मॅनेजर बी. जी. माल्या यांनी याविषयीची माहिती दिली. त्यांनी याच आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये वंदे भारत एक्सप्रेसचं स्लीपर व्हर्जन येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्लीपर वंदे भारत ट्रेन तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मार्च, 2024 मध्ये ही ट्रेन सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
वंदे मेट्रोला पण मुहूर्त
वंदे मेट्रोला पण मुहूर्त लागणार आहे. 12 कोचची ही ट्रेन छोट्या रुटवर चालविण्यात येईल. पहिली वंदे मेट्रो ट्रेन जानेवारी, 2024 मध्ये येण्याची शक्यता आहे. पण ही ट्रेन या वर्षाअखेरीस तयारी होण्याची शक्यता आहे. नॉन-एअर कंडीशन प्रवाशांसाठी ही रेल्वे 31 ऑक्टोबरपर्यंत येईल, अशी शक्यता आहे. यामध्ये 22 कोच आणि दोन्ही बाजूने एक एक लोकोमोटिव्ह असेल.
स्लीपर वंदे भारत तयार करण्याचे काम संयुक्तपणे करण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे विकास निगम लिमिटेड आणि रशियाचा टीएमएम समूह सहभागी आहेत. या दोघांनी 200 पैकी 120 स्लीपर वंदे भारत तयार करण्यासाठी सर्वात कमी बोली लावली होती. इतर 80 ट्रेन टीटागड व्हॅगन्स आणि बीएचईएल हे संयुक्तपणे तयार करुन देत आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा वेग 160 किमी प्रती तास असेल. यामध्ये 16 कोच असतील. त्यात 11 एसी3, चार एसी2 आणि एक एसी1 कोच असेल. वंदे भारत स्लीपर व्हर्जनच्या कोचची संख्या 20 वा 24 असू शकते.