देशातील अनोखी रेल्वे स्थानकं, माहिती वाचून चक्रावून जाल!

| Updated on: Dec 24, 2024 | 2:09 PM

भारतातील रेल्वे नेटवर्क विस्तृत असून, त्यातील काही स्थानके त्यांच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत. भवानी मंडी स्थानक दोन राज्यांच्या सीमेवर असून, त्यात राजस्थानाचा आणि मध्य प्रदेशाचा झेंडा आहे. अटारी शाम सिंह स्थानक भारत-पाकिस्तान सीमेवर असून, येथे प्रवासासाठी व्हिसा आवश्यक आहे. नवापूर स्थानक महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये वसले आहे आणि...

देशातील अनोखी रेल्वे स्थानकं, माहिती वाचून चक्रावून जाल!
Follow us on

भारतात जगातील सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. आजही लोक रेल्वेनेच प्रवास करण्यावर भर देत असतात. लाखो लोक रोज रेल्वेतून प्रवास करत असतात. तुम्हाला एक्सप्रेस असो किंवा लोकल कधीच रिकामी दिसणार नाही. अगदी जवळच्या अंतरावर जाणाऱ्या रेल्वेतही गर्दी असतेच. भारतात एकूण 7,308 रेल्वे स्थानकं आहेत. त्यामध्ये काही स्थानकं त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत. ही कोणती वैशिष्ट्ये आहेत? आणि कोणती रेल्वे स्थानके आहेत ते आज आपण पाहूया.

भवानी मंडी रेल्वे स्थानक

भवानी मंडी रेल्वे स्थानक हे देशातील अनोखं रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक दिल्ली – मुंबई रेल्वे मार्गावर आहे. पश्चिम-मध्य रेल्वे विभागाच्या अंतर्गत हे स्थानक येतं. हे स्थानक दोन राज्यांच्या सीमेवर आहे. या स्थानकाच्या उत्तरेकडील भागात मध्य प्रदेशातील मंठूर जिल्हा आणि दक्षिणेकडील भागात राजस्थानातील जलवाड जिल्हा आहे. त्यामुळे, राजस्थानातील तिकिट काऊंटरवरून तिकिट घेतल्यावर प्रवाशाला मध्य प्रदेशातील ट्रेनमध्ये चढावे लागते. या स्थानकाच्या एका टोकावर राजस्थानाचा झेंडा आणि दुसऱ्या टोकावर मध्य प्रदेशाचा झेंडा लावण्यात येतो.

अटारी शाम सिंह रेलवे स्टेशन

अटारी शाम सिंह रेलवे स्टेशन पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आहे. शाम सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्थानकाला हे नाव देण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या या स्थानकावरून प्रवास करताना व्हिसा लागतो. भारत-पाकिस्तान सीमेवरच्या या स्थानकावर व्हिसाशिवाय उतरणं गुन्हा मानला जातो. या स्थानकावर 24 तास सुरक्षा रक्षकांची देखरेख असते.

हे सुद्धा वाचा

नवापूर रेल्वे स्थानक

नवापूर रेल्वे स्थानक हे भारतातील आगळ्यावेगळ्या स्थानकांपैकी आहे. हे स्थानक सुद्धा दोन राज्यांच्या सीमेवर आहे. या रेल्वे स्टेशनचा एक भाग महाराष्ट्रात तर दुसरा भाग गुजरातमध्ये येतो. त्यामुळे येथे हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी या चार भाषांमध्ये घोषणा केली जाते.

राय नगर/ रैना रेल्वे स्थानक

रैना नगर किंवा राय नगर रेल्वे स्थानक पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील रैना येथे आहे. हे एक छोटसं रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक राय नगर आणि रेना गाव दोन गावांच्या सीमेवर आहे. या स्थानकाचे आधी राय नगर स्थानक असे नाव ठेवले गेले होते, पण नंतर रेनाचं गाव असं दाखवण्यात आलं. पण नावावरून दोन्ही गावांमध्ये संघर्ष होऊ लागला. त्यामुळे भारतीय रेल्वेने त्याच्या स्थानकाचे नाव हटवून अनामिक ठरवले. इतर रेल्वे स्थानकांवर टिकटांवर राय नगर / रेनाच्या नावांची माहिती असली तरी या स्थानकाचं नाव न ठेवता वापरले जाते.