भारताच्या या शहरात हवेतून उडणार टॅक्सी, अवघ्या मिनिटांत होणार तासांचा प्रवास

| Updated on: Nov 10, 2023 | 12:51 PM

आता ट्रॅफीक जामच्या कटीकटीतून लवकरच सुटका होणार आहे. एका अमेरिकन कंपनीच्या मदतीने भारतात लवकरच एअर टॅक्सीची योजना सुरु होणार आहे. त्यामुळे वाहतूकीसाठी जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तासाभराचा प्रवास आता अवघ्या मिनिटांत पूर्ण होणार आहे.

भारताच्या या शहरात हवेतून उडणार टॅक्सी, अवघ्या मिनिटांत होणार तासांचा प्रवास
air taxi
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : लवकरच हवेतून टॅक्सी चालविण्याचे स्वप्न वास्तवात येणार आहे. या एअर टॅक्सीचा प्रयोग लवकरच भारतात होणार आहे. त्यामुळे भारतीयांची ट्रॅफीक जामच्या कटकटीतून कायमची सुटका होणार आहे. यासाठी इंडिगोची पॅरेंट कंपनी इंटरग्लोब एंटरप्राईझेसने अमेरिकेतील इलेक्ट्रीक व्हर्टीकल टेकऑफ एण्ड लॅंडींग ( ईव्हीटीओएल ) आर्चर एव्हीएशन सोबत सामंजस्य करार केला आहे. दोन्ही कंपन्यांनी साल 2026 पर्यंत इलेक्ट्रीक टॅक्सी सर्व्हीसची सुरुवात करण्याची जोरदार तयारी केली आहे.

दुबई येथे अलिकडेच एअर टॅक्सीचा प्रयोग यशस्वी झाला होता. इंटरग्लोब एंटरप्राईझेसची योजना या सेवेला अमेरिकन कंपनी आर्चर एव्हीएशनच्या मदतीने सुरु करण्याची आहे. इंटरग्लोब-आर्चर कंपनीचे टार्गेट प्रवाशांना राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कनॉट प्लेस पासून हरियाणाच्या गुरुग्राम येथे सात मिनिटांत एअर टॅक्सीने पोहचविण्याचे आहे. रस्ते मार्गाने 27 किमीच्या या प्रवासाला एक ते दीड तासांचा वेळ लागतो.

कंपनीची योजना

शहरी हवाई टॅक्सी सेवेशिवाय या दोन कंपन्या भारतात इलेक्ट्रीक विमानांसाठी कार्गो, लॉजिस्टीक्स, वैद्यकीय आणि इमर्जन्सी सेवे सोबत चार्टर सेवेसह अन्य अनेक सेवा देण्याची तयारी करीत आहेत. सध्या भारतात ईव्हीटीओएलचे कोणतीही विशिष्ट धोरणे किंवा नियम नाहीत. तसेच कोणताही पायाभूत नाहीत.

दिल्ली, मुंबईतून सुरु होणार सेवा…

एअर टॅक्सीची सेवा आधी राजधानी दिल्लीतून होणार असली तर आर्थिक राजधानी मुंबईतून देखील ही सेवा सुरु करण्याची योजना आहे. सुरुवातीला ही सुविधा थोडी महाग असू शकते. हेलिकॉप्टरच्या धर्तीवर ही सेवा सुरु होऊ शकते. भविष्यातील एअर टॅक्सीचे जाळे निर्माण होऊ शकते. त्यासाठी एअर ट्रॅफीक कंट्रोलर तसेच रडार यंत्रणा यांचे काम वाढणार आहे.