IndiGo ची मोठी घोषणा, 1000 हून अधिक महिला पायलटची भरती करणार

| Updated on: Aug 15, 2024 | 9:40 PM

इंडिगो कंपनी आपल्या वर्कफोर्सला जास्त डायव्हर्स आणि इंक्लुसिव्ह बनविण्याचे लक्ष्य ठेवले आहे त्यामुळे इंडिगो कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

IndiGo ची मोठी घोषणा, 1000 हून अधिक महिला पायलटची भरती करणार
women pilot
Follow us on

भारतात एव्हीएशन सेक्टर तेजीत आहे. देशांर्गत सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठी घोषणा केली आहे. लवकरच 1000 महिला पायलट लवकरच भरती करणार आहे. कंपनीने आपल्या सेवांचा विस्तार असा काही केला आहे की त्यांच्याकडे पायलटची पोस्ट तातडीने भराव्या लागणार आहेत. डोमेस्टीक फ्लायर्स क्षेत्रात जगातील टॉप देशात भारताचा समावेश आहे.अशात कंपनीने आपल्या ताफ्यातील महिला पायलटची संख्या हजाराहून अधिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकरच प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे महिला पायलटना सुगीचे दिवस येणार आहेत.

भारतात एव्हीएशन सेक्टर जोमाने असल्याने इंडिगो विमान  कंपनी आपल्या ताफ्यात येत्या एक वर्षांत महिला पायलटांची संख्या एक हजाराहून अधिक करणार आहे. आता कंपनीच्या ताफ्यात आठशेच्या आसपास महिला पायलट आहेत.

सर्वसमावेशकतेवर भर राहणार

कंपनी एयरलाइन इंजीनियरिंग आणि फ्लाईंग स्टाफसह प्रत्येक सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणाता सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कपनीने 360 डिग्री एप्रोचवर काम करीत आहे असे इंडिगो ग्रुपचे प्रमुख एचआर सुखजीत एस.पसरीचा यांनी सांगितले.

इंजीनियरिंग सेगमेंटमध्ये महिलाची संख्येत सुमारे 30 प्रतिशत टक्के वाढ झाली आहे. आता देशातील सर्व विमान कंपन्यामध्ये इंडिगो विमान कंपनीकडे ज्यास्त महिला पायलट आहेत. ही संख्या कंपनीच्या एकूण पायलट्सच्या सुमारे 14 टक्के आहे. जागतिक पातळीवर देखील विमान कंपन्यात महिला पायलट्स सरासरी 7 ते 9 टक्के आहेत.

2025 पर्यंत टार्गेट होणार पूर्ण

इंडिगोने म्हटलंय की महिला पायलटच्या संख्येला 1,000 च्या पार करण्याचे टार्गेट ऑगस्त 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. इंडिगो विमान कंपनी दररोज 5000 हून अधिक फ्लाइट्सचे संचलन करत आहे. कंपनीजवळ एकूण 5,000 हून अधिक पायलट आहेत.भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या विमान कंपनीने बुधवारी आपल्या एयरबस आणि एटीआर विमानांसाठी एकूण 77 महिला पायलटांची भरती केलेली आहे. इंडिगोजवळ 31 मार्च 2024 पर्यंत 36,860 पर्मानंट कर्मचारी होते. यात 5,038 पायलट आणि 9,363 केबिन क्रू देखील आहेत.यात 713 महिला पायलट आहेत.यात एलजीबीटीक्यू वर्गाचे कर्मचारी देखील आहेत.