नवी दिल्ली – भारत-चीन (China–India) सीमेवर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) हाडं गोठवणाऱ्या थंडीत देशाच्या सीमांवर पाय रोवून उभे आहेत. उत्तराखंडमध्ये 15 हजार फूट उंचीवर हे जवान देशाचं संरक्षण करत आहेत. या जवानांचे अनेक किस्से आपण व्हिडीओच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाहिले आहेत आणि ऐकले देखील आहेत. जवानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (International Yoga Day) आगोदर हिमालयातील बर्फावर योगा केला आहे. जवानांच्या एक तुकडीने हा योगा केला आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसांच्या अधिकृत ट्विटर हॅडलवरून व्हिडीओ शेअर करून माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्या बर्फात जवान उत्साहाने योगा करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
#Himveers of Indo-Tibetan Border Police (ITBP) in #Yoga sessions at 15,000 feet in snow conditions in Uttarakhand Himalayas under the aegis of forthcoming International Day of Yoga 2022.#YogaAmritMahotsav#AzadiKaAmritMahotsav #internationaldayofyoga2022 #IYD2022 #yogalife pic.twitter.com/ZcKjDH6ZMA
— ITBP (@ITBP_official) April 29, 2022
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसांना हिमवीर म्हटलं जातं. आगामी आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 च्या निमित्ताने उत्तराखंड हिमालयातील 15,000 फूट उंचीवर इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) चे हिमवीर योग सत्रात सहभागी झाले होते. त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये हिमवीर क्रॉस पाय लावून बसले आहेत. “हम है हिमवीर” अशी घोषणा ते देत आहेत. जवानांनी त्यांच्या चटईवर अनेक योगासने केली आहेत. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी त्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या आहेत.
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जवानांनी लडाखमध्ये 18,000 फूट उंचीवर योगासने केली होती. 2015 पासून, आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. काही महिन्यांपूर्वी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. त्यामध्ये जवान थंडीत पुश-अप करताना दिसत होते. जमिनीपासून 17 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर 65 पुश-अप करत सैनिकांनी सर्वांना आश्चर्यचकित केले.