एकेकाळी आंदोलनात खाल्ल्या लाठ्या, गोळी स्पर्शून गेली, आता 96 वर्षांच्या शालिनी डबीर यांना राममंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रण

| Updated on: Jan 07, 2024 | 8:50 PM

अयोध्यानगरीत राम मंदिराचे उद्घाटन येत्या 22 जानेवारीला होत आहे. यावेळी 1008 हुंडी महायज्ञाचे आयोजन ही केले आहे. ज्यात श्रध्दाळुंना भोजन दिले जाणार आहे. हजारो भक्तांच्या निवासासाठी तंबूंची व्यवस्था करण्यात आली आहे. देश आणि विदेशातील पाहुण्यांना या सोहळ्यांचे आमंत्रण देण्यात आले आहे.

एकेकाळी आंदोलनात खाल्ल्या लाठ्या, गोळी स्पर्शून गेली, आता 96 वर्षांच्या शालिनी डबीर यांना राममंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रण
shalini dabir ram mandir
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

अयोध्या | 7 जानेवारी 2024 : नव्वदच्या दशकात राम मंदिर आंदोलन जेव्हा मोठ्या प्रमाणात पेटले होते. त्यावेळी अनेक कारसेवकांना बलिदान द्यावे लागले. अनेकांना लाठ्याकाठ्या खाव्या लागल्या.अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यापैकी एक असलेल्या कारसेवक शालिनी डबीर यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रण मिळाले आहे. शालिनी डबीर ज्यावेळी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, त्याच वेळी त्यांचे वय 63 इतके होते. आज त्यांचे वय 96 इतके आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्या मरणातून बचावल्या, त्यांना बंदूकीची गोळी चाटून गेली होती. परंतू त्यानंतर त्यांना लाठ्या खाव्या लागल्या तुरुंगात रहावे लागले.

बाबरी मस्जिद ज्यावेळी कोसळली त्यावेळेच्या आंदोलनाच्या आठवणी सांगताना त्यांचा अंगावर रोमांच उभे रहातात. तुरुंग भरल्याने त्यांना एका शाळेमध्ये बंद करण्यात आल्याचे शालिनी डबीर सांगतात. त्यावेळी 63 वर्षांच्या असलेल्या शालिनी या 60 किमी चालत अयोध्येला पोहचल्या होत्या, 30 ऑक्टोबर 1990 रोजी त्यांनी अयोध्येला पोहचल्यानंतर बाबरीच्या बांधकामावर भगवा फडकताना पाहीला होता. महाराष्ट्रातून साल 1990 च्या राम मंदिर आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांना गोळी चाटून गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या शेजारील व्यक्ती त्यात मरण पावल्याचे त्या सांगतात. अनेक प्रयत्नानंतर एक ही भिंत कोसळत नव्हती. तेव्हा एका भिंतीवर एक माकड बसले आणि ती भिंत कोसळल्याचे त्या सांगतात. बाबरी कोसळल्यानंतर एक मुस्लीम व्यक्ती समोर आला त्याने मिठाई देत म्हटले की आता तुम्हा जी गोष्ट हवी होती ती मिळाली असे म्हटल्याचे त्यांनी सांगितले. राम मंदिराच्या निर्मितीमुळे अतिशय आनंद होत असल्याचे शालिनी डबीर यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारमुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण आता म्हातारे झाल्याने आपल्याला चालता येत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

अयोध्यानगरी राममय

राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरु आहे. अयोध्यानगरी अगदी राममय झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या 22 जानेवारीला भव्य राम मंदिरात रामललाची मूर्तीची स्थापना होणार आहे. श्री राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टने या सोहळ्याचे विविध मान्यवरांना आमंत्रण दिले आहे. ट्रस्टने या सोहळ्यासाठी 4,000 साधू संतांनाही आमंत्रण दिले आहे. अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठीचे वैदिक अनुष्ठान मुख्य समारंभाच्या एक आठवडा आधी 16 जानेवारीला सुरु होणार आहे. वाराणसीचे पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित 22 जानेवारीला रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचे मुख्य अनुष्ठान करणार आहेत. 14 ते 22 जानेवारीपर्यंत हा सोहळा होणार आहे.