ही आहे पाकिस्तानची सर्वात श्रीमंत महिला, इतकी आहे संपत्ती

| Updated on: Aug 15, 2023 | 8:59 PM

पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे तुम्हाला माहीत आहे का. तिची संपत्ती किती आहे. आता आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या श्रीमंत महिलेविषयी सांगणार आहोत.

ही आहे पाकिस्तानची सर्वात श्रीमंत महिला, इतकी आहे संपत्ती
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानची अर्थव्यवस्था अतिशय वाईट स्थितीत आहे. सरकारला गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे. परंतु, काही व्यक्ती अशा आहेत ज्या व्यवहारामुळे लोकप्रीय आहेत. त्यांनी आपल्या कौशल्याने खूप पैसे कमवले आहेत. सरकारला आयकर भरत आहेत. तुम्ही हिंदुस्थान, आशिया आणि जगातील श्रीमंत व्यक्तींविषयी ऐकलं असेल. परंतु, पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे तुम्हाला माहीत आहे का. तिची संपत्ती किती आहे. आता आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या श्रीमंत महिलेविषयी सांगणार आहोत.

पाकिस्तानातील श्रीमंत महिलेविषयी जाणून घ्या

पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिलेची संपत्ती एक बिलीयन डॉलर आहे. ती महिला मिया उमर मंशाची पत्नी इकरा हसन मंशा आहे. मिया उमर मंशा हे प्रापर्टी डीलर आहेत. पाकिस्तानातील दुसरे श्रीमंत व्यक्ती मिया मुहम्मद मंशा यांचा मुलगा आहे. इकरा मंशा निशात होटल्स अँड प्रापर्टीजचे सीईओ आहेत. इकरा पाकिस्तानातच नव्हे तर लंडनमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल सांभाळते.

गौतम अडाणी यांचे नेटवर्थ ५५ बिलीयन डॉलर

इकरा यांनी लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीजचा अभ्यास पूर्ण केला. इकरा काही कंपन्यांची मालक आहे. परंतु, तिच्या संपत्तीचा डाटा सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही. परंतु, अंदाजे इकराची संपत्ती एक बिलीयन अमेरिकन डॉलरच्या जवळपास आहे. तिची तुलना अंबानी-अडाणी यांच्याशी होऊ शकत नाही. कारण मुकेश अंबानी यांचे नेटवर्थ ९० बिलीयन डॉलर आहे. तर गौतम अडाणी यांचे नेटवर्थ ५५ बिलीयन डॉलर आहे.

इकराने दिले सर्वात जास्त रोजगार

इकराचे सासरे मिया मुहम्मद मंशा हे पाकिस्तानातील पहिले अरबपती व्यक्ती आहेत. त्यांना पाकिस्तानचा मुकेश अंबानी समजण्यात येते. फोर्ब्सनुसार, निशात गृप कॉनच्या कपड्याची निर्यात करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. तिने सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून दिले आहेत.

मंशाची कंपनी पॉवर प्रोजेक्ट, सीमेंट आणि विमा क्षेत्रात गुंतवणूक करते. १९९१ मध्ये मिया मंशा यांनी मुस्लीम कम्युनिटी बँकेसाठीची बोली जिंकली. परंतु, त्यांनी २००८ मध्ये एमसीबीमध्ये आपले अर्धे शेअर विकण्याचा निर्णय घेतला. रिपोर्ट नुसार मंशाची सध्याची संपत्ती ५ बिलीयन अमेरिकी डॉलर आहे.