मुंबई : कोरोना संकटाच्या काळात लोक प्रवास टाळत आहेत. अशावेळी विविध विमान कंपन्या अनेक ऑफर्स देत आहेत. त्यासाठी ते बुकिंग एजन्सीचं सहकार्यही घेत आहेत. अशात तुम्ही प्रवास करणार असाल आणि IRCTC ची वेबसाईट आणि अॅपद्वारे फ्लाईटचं तिकीट बुक करणार असाल तर तुम्हाला 50 लाख रुपयांचा विमा मोफत मिळणार आहे. इतकंच नाही तर कंपन्यांकडून तिकीट बुकिंग व्यतिरिक्त अन्य कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही. (IRCTC offers insurance of Rs 50 lakh on plane ticket)
विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी IRCTC अनेक सुविधा देत आहे. त्यात तिकिटांचं री-शेड्यूलिंग, रिफंडसह अनेक सुविधांचा समावेश आहे. या ऑफरद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट्ससह सर्व श्रेणीतील तिकीट बुक करणाऱ्या यात्रेकरुंना फायदा होणार आहे.
IRCTC कडून संरक्षण क्षेत्रातील जवानांना विमान प्रवासा दरम्यान अतिरिक्त सूट दिली जाईल. त्यांनी विमान कंपन्यांकडून विशेष प्रवास किराया ऑफर दिला जाणार आहे. त्यासह कंपनीकडून एलटीसी तिकीट बुकिंग केलं जाणार असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
IRCTC कडून ग्राहकांना एकसोबत विविध शहरांसाठी तिकीट बुकिंग, क्रेडिट शेल, सुपर सेव्हर, री-शेड्यूलिंग आणि रिफंड बाबात अनेक सुविधा दिल्या जात आहे. कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन तिकीट बुक केल्यास स्पेशल डिस्काउंटसह अतिरिक्त सूटही मिळू शकते.
IRCTC नुसार ट्राव्हल साईट्स प्रति तिकीटाच्या हिशेबानुसार 200 रुपये प्रोसेसिंग शुल्क आकारते. तर IRCTC चं म्हणणं आहे की हे शुल्क फक्त 50 रुपये आकारलं जात आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार नाही.
संबंधित बातम्या :
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्पाइसजेटची खास ऑफर, जाणून घ्या सर्व माहिती
IRCTC offers insurance of Rs 50 lakh on plane ticket