Health Survey : इच्छा नसताना जर तिने संभोगास नकार दिला तर…? पुरुषांनी नोंदवलेलं पत्नीबद्दलचं मत वाचण्यासारखंय!

| Updated on: May 10, 2022 | 2:40 PM

तब्बल 80 टक्के महिला या लैंगिक संबंधांसाठी पतीला नकार देण्यास सक्षम आहेत, अशीही आकडेवारी अहवालातून समोर आली.

Health Survey : इच्छा नसताना जर तिने संभोगास नकार दिला तर...? पुरुषांनी नोंदवलेलं पत्नीबद्दलचं मत वाचण्यासारखंय!
काय म्हणाले विवाहीत पुरुष?
Image Credit source: instagram
Follow us on

नवी दिल्ली : लग्नानंतर होणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा सातत्यानं चर्चेत येतो. अशातच राष्ट्रीय कौटुंबीक आरोग्य सर्वेक्षणातून (NFHS) समोर आलेल्या अहवालानं महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर आणली आहे. या अहवालानं एक बाब स्पष्ट केली आहे. प्रचंड थकवा आलेली एखादी पत्नी तर लैंगिक संबंधास (Physical Relation) नकार देत असेल, तर ते योग्य असून त्याचा स्वीकार करायला हवा, मत बहुतांश पुरुषांनी नोंदवलं आहे. याप्रकरणाचा अहवालही समोर आलाय. या अहवालानुसार पुरुषांनी नोंदवलेलं हे मत 66 टक्के इतकं होतं. NFHS-5 म्हणजेच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी (Central Health Minister) गेल्या आठवड्यात दिलेल्या आकडेवारीतून ही बाबत समोर आली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वीच कर्नाटक हायकोर्टानं लैंगिक संबंध नाकारण्यावरुन महत्त्वाची टिप्पणी केली होती. आपल्या जोडीदारास लैंगिक सुख नाकारणं ही क्रूर शिक्षा असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं होतं. त्यानंतर आता समोर आलेल्या सर्वेक्षणाची चर्चा सुरु आहे.

कोण होतं सर्वेक्षणाचा भाग?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलेला या सर्वेक्षणात महिला आणि पुरुष अशा दोघांचाही समावेश होता. वय वर्ष 15 ते 49 या वयोगटातील स्त्रिया आणि पुरुषांना या सर्वेक्षणादरम्यान, काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नाबाबतचे पर्यायही यावेळी देण्यात आले होते. त्यातून समोर आलेल्या आकडेवरुन महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आलेत.

2015-16 दरम्यान, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल जारी करण्यात आला होता. हा चौथा अहवाल होता. त्यानंतर आता दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर पाचवा अहवाल जारी करण्यात आला. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी हा अहवाल नुकतान जारी केला होता.

80 टक्के महिलांचा नकार!

दरम्यान, तब्बल 80 टक्के महिला या लैंगिक संबंधांसाठी पतीला नकार देण्यास सक्षम आहेत, अशीही आकडेवारी अहवालातून समोर आली. याबाबत तीन पर्याय महिलांना देण्यात आले होते. त्या तीनही पर्याय रास्त असल्याचं मानत महिलांनी पतीला लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणं योग्य असल्याचं म्हटलंय.

लैंगिक संबंधांमुळे एखादा संसर्ग होण्याची भीती असेल, पती दुसऱ्या एखाद्या स्त्री सोबत संबंध ठेवत असेल किंवा पत्नी थकली असेल आणि तिची इच्छा नसेल, तर लैंगिक संबधाला नकार देणं, हे योग्य असल्याचं महिलांनी मान्य केलंय. 100 पैकी 80 महिलांना ही बाब योग्य वाटत असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय.

प्रमाण वाढलं!

पत्नीनं लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणं, ही बाब योग्य आहे, असं मानणाऱ्या पुरुषांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. याआधीच्या अहवालाच्या तुलनेत यंदा 3 टक्के पुरुषांना पत्नीनं संबंधास नकार देणं, हा तिच्या मूलभूत स्वातंत्र्याचा अधिकार आहे, असं वाटलंय. या अहवालाच्या अनुशंगानं आणखी एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे.

भारतीय संविधानानुसार 15 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या पत्नीसोबत लग्नानंतर ठेवलेले संबंध हे बलात्कार नसल्याचंही स्पष्टपणे म्हटलेलं आहे. कलम 375 मध्ये हा एक अपवाद आहे. या सगळ्यात 8 टक्के महिला आणि 10 टक्के पुरुषांना मात्र लैंगिक संबंध आपल्या पत्नीनं नाकारणं योग्य नसल्याचं जाणवलंय.