ईशा योग केंद्र: महाशिवरात्रीच्या रात्री सद्गुरुंनी अनुयायांनाही डोलायला लावले…

| Updated on: Feb 19, 2023 | 11:21 PM

शिवरात्रीच्या अध्यात्मिक प्रकाशाने आपल्या जीवनातील प्रत्येक दिवशी आपला मार्ग उजळून निघो, असंही त्यांनी सांगितले. ईशा फाऊंडेशनचे संस्थापक जग्गी सद्गुरू यांच्या योगदानाचे कौतुक करताना राष्ट्रपती म्हणाले की ते आधुनिक काळातील ऋषी आहेत.

ईशा योग केंद्र: महाशिवरात्रीच्या रात्री सद्गुरुंनी अनुयायांनाही डोलायला लावले...
Follow us on

चिक्कबल्लापूरः कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे ईशा फाऊंडेशनने महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ईशा फाऊंडेशनच्या कार्यक्रमामध्ये पवित्र रात्री अनेक मिरवणुकाही यावेळी काढण्यात आल्या. नव्याने उद्घाटन झालेल्या आध्यात्मिक केंद्रात दिवसभरामध्ये अनेक भक्तांनी दीपार्पणमध्‍ये सहभाग नोंदवला. कोईम्बतूरमधील ईशा योग केंद्राची प्रतिकृती असलेल्या 112 फूट आदियोगी पुतळ्याच्या आवारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाशिवरात्रीच्या रात्री कोईम्बतूरमध्ये प्रचंड गर्दीत हा कार्यक्रम झाला होता. जिथे मध्यरात्री ध्यानाचे आयोजनही करण्यात आले होते.

सद्गुरु उर्फ ​​जग्गी वासुदेव यांच्या अनुयायांमध्ये येथे आयोजित केलेल्या आध्यात्मिक कार्यक्रम खूप लोकप्रिय आहेत. दरवर्षी येथे मोठ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते,

सद्गुरुंनी स्वतः येथे त्यांच्या अनुयायांशी संवाद साधला होता. तर यावेळी ते नाचतानाही दिसून आले, तर त्यांचे इथे भक्तही नाटताना दिसून आले.

राम मिरजाला, कुतळे खान, मंगली, वेलमुरुगन, मीनल जैन, अनन्या चक्रवर्ती, निहार शेंबेकर आणि कन्नड लोकगायकांसह अभिनेत्यांनी ईशा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये अध्यात्मिक संगीत कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले. इतकेच नाही तर जॉर्जियाच्या डान्स ग्रुपसह केरळच्या थेय्याम डान्सर्सनेही लोकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमांमध्ये महाशिवरात्रीचे महत्त्व सांगताना सद्गुरू यांनी सांगितले की, प्रत्येकाने प्रत्यक्ष साधक, सत्याचे साधक, बाह्य आणि आंतरिक दोन्ही प्रकारे जीवनाचे समाधान शोधणारे बनण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करण्याचा हा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.

ईशा फाऊंडेशन आयोजित केलेल्या मिडनाईट मेडिटेशन रात्री 10 वाजता सुरू झाले होते आणि मध्यरात्रीपर्यंत चालले होते. सकाळी 6 वाजता कार्यक्रमाची सांगताही झाली होती.

तर ईशा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले आहे. ज्यामध्ये अध्यक्ष द्रौपदी मुर्मू देखील सहभागी झाल्या होत्या.

जानेवारीमध्ये, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेंगळुरूपासून सुमारे 60 किमी अंतरावर असलेल्या चिक्कबल्लापूर येथे 112 फूट उंचीच्या आदियोगी पुतळ्याचे उद्घाटन केले आहे.

आदियोगींच्या 112 फूट उंच पुतळ्याजवळील ईशा योग केंद्रात भक्तांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, महाशिवरात्री हा काळ अंधकार आणि अज्ञानाचा अंत आणि ज्ञानाचा मार्ग खुला करणारा म्हणून साजरी केली जाते.

शिवरात्रीच्या अध्यात्मिक प्रकाशाने आपल्या जीवनातील प्रत्येक दिवशी आपला मार्ग उजळून निघो, असंही त्यांनी सांगितले. ईशा फाऊंडेशनचे संस्थापक जग्गी सद्गुरू यांच्या योगदानाचे कौतुक करताना राष्ट्रपती म्हणाले की ते आधुनिक काळातील ऋषी आहेत.

आणि असंख्य लोकांना, विशेषत: भारत आणि विदेशातील तरुणांना त्यांच्याकडून आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळाली आहे. यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी, राज्याचे आयटी मंत्री मनो थंगराज हेही यावेळी उपस्थित होते.

महाशिवरात्रीनिमित्त  TV 9 Bharat Varsha एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी योगाच्या प्रचारासाठी प्रसिद्ध असलेल्या सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्याशी शिवाचे महान स्वरूप, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानावर कार्यक्रमात संवाद साधला. तो कार्यक्रम आपण ते येथे पाहू शकता.