येथे बांधले जात आहे जगातील सर्वात उंच हिंदू मंदिर, टोकावरुन दिसणार ताजमहल

| Updated on: Aug 24, 2023 | 1:59 PM

हिंदू धर्मियांना अभिमान वाटेल असे अनोखे हिंदू मंदिर बांधण्यास सुरुवात झाली आहे. या मंदिराच्या टोकावरुन तुम्हाला दुर्बिणीने आगरा येथील जगप्रसिध्द ताजमहाल पाहता येईल.

येथे बांधले जात आहे जगातील सर्वात उंच हिंदू मंदिर, टोकावरुन दिसणार ताजमहल
chandroudaya temple
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : ताजमहाल जगातील सात आश्चर्यापैकी एक मानले जात असून उत्तरप्रदेशातील आगरा येथे आहे. परंतू आता उत्तर प्रदेशातच जगातील भव्य हिंदू मंदिर बांधले जात आहे. भगवान कृष्ण यांच्या जन्मभूमी मथूरा येथे हे अनोखे चंद्रोदय वृंदावन मंदिर बांधले जात आहे. या मंदिराचे बांधकाम साल 2006 पासून सुरु झाले असून त्याचे काम येत्या दीड ते दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. या मंदिराला कोणत्याही नैसर्गिक संकटात काही नुकसान होणार नाही असे त्याचे बांधकाम मजबूत करण्यात येणार आहे. तर पाहूयात काय आहेत या मंदिराची वैशिष्ट्ये…

हिंदू धर्मियांना अभिमान वाटेल असे अनोखे हिंदू मंदिर बांधण्यास सुरुवात झाली आहे. या मंदिराच्या टोकावरुन तुम्हाला दुर्बिणीने आगरा येथील जगप्रसिध्द ताजमहाल पाहता येईल. या मंदिराचे नाव चंद्रोदय मंदिर असे असून या मंदिराला इस्कॉन संस्था अर्थात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ तयार करीत आहे. या मंदिराचा शिलान्यास 16 नोव्हेंबर 2014 रोजी तत्कालिन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आला होता.

सातशे फूट उंची

चंद्रोदय मंदिराला 166 मजले असणार आहेत. त्याची उंची सातशे फूट इतकी असेल, हे जगातील पहीलेच उंच मंदिर असेल. हे मंदिर 70 एकर जागेवर बांधले जाईल, त्यात 12 एकर जागेवर कार पार्किंग असेल. येथे एक हेलीपॅडची सुविधा असेल. येथे कृष्णा थीम पार्क असेल तसेच लाईट एण्ड साऊंड शो आयोजित केला जाईल. हे मंदिर पारंपारिक नागरी वास्तूशैली आणि आधुनिक वास्तूशैलीचा अनोखा मिलाफ असेल.

मंदिराची उंची 828 मीटर

मंदिराच्या बांधकामासाठी 700 कोटी रुपये खर्च येणार आहे. या मंदिराला बांधण्यासाठी देश-विदेशातील एकूण 25 कंपन्या काम करीत आहे. या मंदिराची उंची सुमारे 210 मीटर असेल. जमीनीच्या आतपासून संपूर्ण मंदिराची उंची 828 मीटर असेल. मंदिरापासून ताजमहल 80 किलोमीटरवर आहे. या मंदिराच्या टॉपच्या फ्लोअरवरुन दुर्बिणीने ताजमहल पाहता येऊ शकते. या मंदिराचा पाया 55 मीटर आहे. दुबईतील जगातील सर्वात उंच इमारतीच्या पायापेक्षा या मंदिराचा पाया मोठा आहे. या मंदिराची उंची कुतुब मिनारच्या उंचीपेक्षा तीन पट जास्त असेल. येथे एका वेळी दहा हजार श्रद्धाळूंना प्रार्थनेसाठी बसता येईल अशी प्रशस्त जागा असेल.

भूकंप आणि वादळापासून संरक्षण

नैसर्गिक संकटापासून वाचण्यासाठी या मंदिराला मजबूत बनविले जात आहे. 8 रिश्टरस्केल पेक्षा जादा भूंकपाच्या धक्क्यानेही या मंदिरास काही होणार नाही अशी काळजी घेण्यात आली आहे. या मंदिरासाठी 511 पिलर उभारले जातील हे मंदिर 9 लाख टनाचा भार वाहण्यासाठी सक्षम असेल. दर ताशी 170 किमी वेगाच्या वादळातही त्याला काही होणार नसल्याचे म्हटले जात आहे. या मंदिरात 8 मीटर प्रति सेंकद धावणारी लिफ्ट बसविण्यात येणार आहे.