इस्रायल | 10 डिसेंबर 2023 : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच आहे. हे युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. असताच आता इस्रायली लष्कराने एक मोठा निर्णय घेतला आहे. इस्रायली सैन्याने एकाच वेळी हमासची 100 ठिकाणे नष्ट करण्याचा मोठा प्लॅन आखलाय. आतापर्यंत 17 हजारहून अधिक लोक इस्त्रायली सैन्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत. तर, जखमी झालेल्यांची गिनतीच नाही. अशातच आता इस्त्रायली सैन्याच्या नव्या प्लॅनमुळे जग चिंतेत सापडले आहे. हमासवर पहिला आर्टिफिशियल हल्ला करण्याची तयारी इस्त्रायली सैन्याने सुरु केलीय. ही जगासाठी चिंतेची बाब आहे.
हमासने अतिरेकी संघटनेचा खात्मा करण्याच्या उद्देशाने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये आपले सैन्य घुसविले. त्याचा प्रतिकार करतानाच इस्रायलने संपूर्ण गाझा पट्टी परिसरातून दहशतवाद संपवण्याची शपथ घेतली. 7 ऑक्टोबरपासून इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले हे युद्ध अजूनही सुरु आहे. पंरतु, आता हमासचा शेवट करायचाच या उद्देशाने इस्रायलने जगातील पहिला आर्टिफिशियल हल्ल्याचा (AI) प्लॅन तयार केलाय.
जगात पहिला असणारा असा हा एआय हल्ला किती प्राणघातक असेल याच विचाराने जगाला ग्रासले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार या हल्ल्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या विशेष साधनांचा इस्रायल वापर करत आहे. गॉस्पेल अल्केमिस्ट आणि डेप्थ ऑफ विजडम अशी त्यांची नावे आहेत. लक्ष्य लॉक करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी या प्रणाली डिझाइन केल्या आहेत. गाझामधील हमाससोबतच्या युद्धात या एआय टूल्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
गेल्या आठवड्यात इस्त्रायली सैन्याने गाझामध्ये सुरु असलेल्या युद्धात ‘हबसोरा’ नावाच्या एआय प्रणालीचा वापर केला. बॉम्बस्फोटांसाठी लक्ष्य निवडणे, अतिरेक्यांचे लपलेले ठिकाण शोधणे तसेच संभाव्य मृतांच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी या प्रणालीचा वापर करण्यात आला. सैन्याची ताकद वाढवण्यासाठी, त्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी या प्रणालींचा वापर करण्यात येतो. सैनिकांना अधिक कार्यक्षम बनविण्यासोबतच लढाईचा वेग आणि प्राणघातक हल्ले करण्याची क्षमता या प्रणालीमुळे वाढते.
एआय प्रणाली ही युद्धकाळात गैरसमज किंवा चुकीची माहिती देण्यास हातभार लावू शकते. या प्रणालीमुळे मानव यंत्रांच्या सूचनांवर जास्त विसंबून राहतो. हबसोरा या प्रणालीच्या वापरातून ही बाब समोर आली आहे. त्याचप्रमाणे हबसोरा प्रणाली दिवसाला 100 लक्ष्ये तयार करु शकते असेही उघड झाले आहे.
गाझामधील पॅलेस्टिनींविरूद्ध बदला म्हणून इस्रायलने 2021 मध्ये ‘ऑपरेशन गार्डियन्स ऑफ द वॉल’ सुरू केले. ही लढाई 11 दिवस चालली होती. या लढाईला ‘पहिले एआय वॉर’ असेही म्हणतात. या लढाईत साधनांमधून घेतलेल्या डेटाचा वापर गाझामधील लक्ष्यांना मारण्यासाठी केला होता.
गॉस्पेल स्वयंचलित पद्धतीने शत्रूला लक्ष्य बनवू शकते. ही AI प्रणाली मूलत: आक्रमणकर्त्यांच्या संपूर्ण गटाला एकाच वेळी टार्गेट करू शकते. उच्च वेगाने लक्ष्य गाठण्यासाठी या साधनांचा वापर केला जातो. सिस्टमच्या शिफारशी आणि एखाद्या व्यक्तीने केलेल्या ओळखीशी पूर्णपणे जुळणे हे याचे प्रमुख कार्य आहे. गुप्तचरानी दिलेल्या माहितीची खात्री करून त्यानुसार ‘गॉस्पेल’ प्रणाली कारवाई करते.