मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं संशोधनासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. चंद्रयान 3 मोहीम सुरु असताना इस्रोनं सूर्याच्या अभ्यासासाठी मोहीम हाती घेतली आहे. आदित्य एल 1 सूर्याच्या अभ्यास करण्यासाठी श्रीहरिकोटा स्पेस सेंटरवरून 2 सप्टेंबरला झेपावणार आहे. यासाठी लॉन्चिंगची पूर्वतयारी आणि मोहिमेशी निगडीत सर्व यंत्रणांची तपासणी करण्यात आली आहे. आदित्य एल-1 हे पीएसएलव्ही एक्सएल सी57 च्या माध्यमातून अवकाशात झेपावणार आहे. हे स्वदेशी रॉकेट आदित्य एल-1 पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये पोहोचवण्यास मदत करेल. त्यानंतर आदित्य एल-1 पुढचा प्रवास करत थेट पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाईल. त्यानंतर आदित्य एल-1 सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यानंत असलेल्या एल-पॉइंटवर आपलं ठाण मांडेल. या संपूर्ण प्रवासाला 4 महिन्यांचा अवधी लागेल. म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी प्रवासासाठी निघालेलं आदित्य एल-1 जानेवारी 2024 पर्यंत निश्चित ठिकाणी पोहोचेल.
आदित्य एल-1 मोहीमेसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.50 मिनिटांनी यान सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. आदित्य एल-1 च्या मदतीने सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्यापासून निघणारी किरणांचा अभ्यास केला जाईल. आदित्य एल-1 सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान असलेल्या लॅरेंज प्वाइंट-1 पर्यंत जाईल. हा प्वाइंट पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किमी दूर आहे.
PSLV-C57/Aditya-L1 Mission:
The 23-hour 40-minute countdown leading to the launch at 11:50 Hrs. IST on September 2, 2023, has commended today at 12:10 Hrs.The launch can be watched LIVE
on ISRO Website https://t.co/osrHMk7MZL
Facebook https://t.co/zugXQAYy1y
YouTube…— ISRO (@isro) September 1, 2023
आदित्य एल-1 असलेल्या 7 पेलोड्स सूर्यापासून निघणाऱ्या विविध किरणांचा अभ्यास करेल. तसेच सूर्यापासून येणारी उष्णता आणि गरम हवेचा अभ्यास करणार आहे. यामुळे सौर वायुमंडळबाबत जाणून घेता येणार आहे. यामुळे सूर्यावरील घडामोडींचा पृथ्वीतलावर कसा परिणाम होतो याची माहिती मिळणार आहे.
🚀PSLV-C57/🛰️Aditya-L1 Mission:
The launch of Aditya-L1,
the first space-based Indian observatory to study the Sun ☀️, is scheduled for
🗓️September 2, 2023, at
🕛11:50 Hrs. IST from Sriharikota.Citizens are invited to witness the launch from the Launch View Gallery at… pic.twitter.com/bjhM5mZNrx
— ISRO (@isro) August 28, 2023
चंद्रयान मिशनप्रमाणे आदित्य एल1 मोहिमेत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीएसएलव्ही एक्सएल सी57 पृथ्वीच्या एका कक्षेत सोडेल. पण त्यानंतर पृथ्वीच्या स्पेयर ऑफ इंफ्लूएंसच्या बाहेर जाणं मोठं आव्हान असणार आहे. कारण गुरुत्वाकर्षमामुळे पृथ्वी प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते. त्यानंतर क्रूज फेज आणि हॅलो फेजमध्ये वेगावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर यान थेट सूर्याच्या दिशेने जाईल आणि जळून खाक होईल.