Chandrayan 3 Landing Video | असं झालं चांद्रयान 3 चं लँडिंग, पाहा व्हीडिओ

| Updated on: Aug 24, 2023 | 10:05 PM

Chandrayan 3 | इस्रोने चांद्रयान 3 चंद्रावर कसं उतरलं याचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हीडिओ झटक्यात व्हायरल झाला आहे.

Chandrayan 3 Landing Video | असं झालं चांद्रयान 3 चं लँडिंग, पाहा व्हीडिओ
Follow us on

मुंबई | भारतासाठी बुधवार 23 ऑगस्ट 2023 ही तारीख ऐतिहासिक ठरली. याच तारखेला चंद्रावर भारताचा तिरंगा डौलाने फडकला. भारताचं चांद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. यासह भारताचं मिशन चांद्रयान यशस्वी ठरलं. चांद्रयान मोहिम फत्ते झाल्याने इस्रोच्या शास्त्रज्ञांच जगभरातून कौतुक करण्यात आलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोजी यांनी इस्रोच्या शास्रज्ञांचं कौतुक केलं.

शास्रज्ञांवर चहुबाजूंनी अभिनंदन करण्यात आलं. त्यानंतर काही तासांनी विक्रम लँडरने चंद्रावरील काही फोटो पाठवले. लँडरमधील असलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने चंद्राचे फोटो पाठवण्यात आले. त्यानंतर 24 तासांनी आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर च्रांदयान 3 चं लँडिंग कसं झालं, याचा व्हीडिओ इस्रोने शेअर केला आहे.


चांद्रयान 3 चंद्रावर उतरतानाचा व्हीडिओ इस्रोने ट्विट केला आहे. या व्हीडिओत शेवटच्या 5 ते 7 सेकंदांचा हा सर्व थरार पाहायला मिळतोय. चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शेवटच्या काही सेकंदात यशस्वीरित्या उतरवण्याचं आव्हान होतं. त्याच आव्हानात्मक क्षणाचा व्हीडिओ इस्रोने ट्विट केला आहे.

आता मिशन आदित्य एल 1

दरम्यान चांद्रयान 3 मोहिम फत्ते झाल्यानंतर आणखी एका मोहिमेची चांगलीच चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या टीमचं कौतुक केलं. या दरम्यान मोदींनी नव्या मिशनची घोषणा केली. चंद्रानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आता इस्रो सज्ज झाली आहे. सूर्यावर होणाऱ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी इस्रो आदित्य एल 1 ही मोहिम हाती घेणार आहे.

इस्रोचे शास्त्रज्ञ सज्ज

या मोहिमेतून सूर्यावर नक्की काय घडामोडी होतात, नक्की काय हालचाली होतात, याचा अंदाज आणि अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून ‘आदित्य एल 1’ ही मोहिम हाती घेतली जाणार आहे. आदित्य एल 1 या मोहिमेतून अंतराळातील हवामान गतिशीलता याबाबत माहिती मिळेल, अशी अपेक्षा इस्रोच्या शास्रज्ञांना आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी इस्रोत्या शास्त्रज्ञांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.